शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

न्यूझीलंड महिला संघ उपांत्य फेरीत

By admin | Updated: March 22, 2016 02:55 IST

तीन वेळेचा विश्वविजेता आॅस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धक्का देत न्यूझीलंडच्या महिला संघाने सलग तीन विजयांसह सोमवारी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला

किशोर बागडे,  नागपूरतीन वेळेचा विश्वविजेता आॅस्ट्रेलियाला ६ गड्यांनी धक्का देत न्यूझीलंडच्या महिला संघाने सलग तीन विजयांसह सोमवारी टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला.सुरुवातीला श्रीलंका आणि आयर्लंड यांचा पराभव करणाऱ्या न्यूझीलंडने आज तिसऱ्या सामन्यात आॅस्ट्रेलियावर कमालीचे वर्चस्व गाजविले. विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमच्या फिरकीला अनुकूल वाटणाऱ्या खेळपट्टीवर नाणेफेक गमावल्यानंतरही आॅस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १०३ धावांत रोखण्याची किमया साधली. त्यानंतर १६.२ षटकांत ४ गड्यांच्या मोबदल्यात १०४ धावा करून सामना जिंकला.सूजी बेट्स व राचेल प्रिस्टय या सलामीच्या दोन्ही फलंदाजांनी ८ षटकांपर्यंत ५८ धावा ठोकून विजयाचा पाया रचला. २७ चेंडूंत सर्वाधिक ३४ धावांचे योगदान देणारी प्रिस्ट हिने ५ चौकार आणि १ षटकार हाणला. बेट्सने धावबाद होण्याआधी २५ चेंडूंत २३ धावा केल्या. सोफी डिव्हाईनने १७ चेंडूंत १७ आणि अ‍ॅमी सॅटरवेट हिने नाबाद १६ धावा केल्या. सारा मॅग्लेशन हिने ३ चौकारांसह १६ धावांचे उपयुक्त योगदान दिले. आॅस्ट्रेलियाचा वेगवान आणि फिरकी मारा न्यूझीलंडचा फलंदाजीतील झंझावात रोखण्यात कमालीचा अपयशी ठरल्यामुळे चुरस जाणवलीच नाही. त्याआधी आॅस्ट्रेलियाची सुरुवातही खराब झाली. संघाचे ५ फलंदाज केवळ ३० धावांत तंबूत परतले होते. तथापि, एल्स पेरी (४८ चेंडूंत ४२ धावा, ३ चौकार, १ षटकार) आणि जेसी जोनासेन (२२ चेंडूंत २३ धावा, २ चौकार) यांनी सहाव्या गड्यासाठी ४९ धावांची भागीदारी करून संघाला २० षटकांत ८ बाद १०३ अशा सन्मानजनक स्थितीत आणले. उजव्या- डाव्यखुऱ्या फलंदाजीचा संगम साधणाऱ्या या जोडीने न्यूझीलंडच्या भेदक माऱ्याचा संयमाने सामना करीत शतक गाठून दिले. नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने फलंदाजी घेतली खरी; पण त्यांचे ४ फलंदाज बाद झाले तेव्हा फळ्यावर ४ षटके आणि चारच धावा लागल्या होत्या.लेग कास्पेरिक हिने लागोपाठच्या चेंडूंवर एल्सी विनाली आणि एल्सी हिली यांना बाद केले. दोन दिवसांपूर्वी याच मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजयात मोलाची भूमिका वठविणारी कर्णधार मेग लिनिंग हीदेखील भोपळा न फोडताच धावबाद झाली. कास्पेरिकने इरिन ओबोर्न हिचा बळी घेऊन आॅस्ट्रेलियाला आणखी एक धक्का दिला. एल्सी पेरीला साथ देणाऱ्या अ‍ॅलेक्स ब्लॅकवेलने (१०) त्रिफळाबाद होण्यापूर्वी पाचव्या गड्यासाठी २६ धावांची भागीदारी केली. न्यूझीलंडकडून लेग कॅस्पेरिक हिने १३ धावांत ३ आणि इरिन बर्मिंघम हिने २३ धावांत २ गडी बाद केले.>सोफीचा ५० बळींचा विक्रम न्यूूझीलंडची मध्यम-जलद गोलंदाज सोफी डिव्हाईन हिने आज टी-२० सामन्यात ५० बळींचा टप्पा गाठला. तिने आॅस्ट्रेलियाची धोकादायक फलंदाज एल्सी पेरी हिचा अडथळा दूर करून ५०वा बळी मिळविला. अशी कामगिरी करणारी न्यूझीलंडची ती पहिलीच गोलंदाज बनली आहे.२६ वर्षांच्या सोफीने २००६मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन येथे पदार्पण केले होते. अष्टपैलू खेळाडू, संघातील सर्वांत अनुभवी सिनिअर आणि उपकर्णधार अशी जबाबदारी सांभाळणारी सोफी हा न्यूझीलंड संघाचा आधारस्तंभ ठरला आहे.> संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : २० षटकांत ८ बाद १०३ धावा (एल्स पेरी ४२, जेस जोनासेन २३, बेथ मुनी १५, अ‍ॅलेक्स ब्लॅकवेल १०, लेग कास्पेरेक १३/३, इरिन बर्मिंघम २३/२, सोफी डिव्हाईन २५/१). न्यूझीलंड : १६.२ षटकांत ४ बाद १०४ धावा. (राचेल प्रिस्ट ३४, सुजी बेट्स २३, सोफी डिव्हाईन १७, अ‍ॅमी सॅटरवेट नाबाद १६, सारा मॅग्लेशन १६; क्रिस्टेन बिम्स, इरिन औसबर्न, लॉरेन चेटर प्रत्येकी १ बळी.)