शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

आयपीएलमध्ये "हा" विक्रम करणारा नेहरा पहिला गोलंदाज

By admin | Updated: April 6, 2017 12:48 IST

इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला काल हैदराबादमध्ये दणक्यात सुरूवात झाली.सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला 35 धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले.

ऑनलाइन लोकमत
हैदराबाद, दि. 6 -  इंडियन प्रिमियर लिगच्या 10 व्या सत्राला काल हैदराबादमध्ये दणक्यात सुरूवात झाली. युवराज सिंग आणि मोइसेस हेन्रीक्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने रॉयल चॅलेंजर्स बॅंगलोरला 35 धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले.
 
या सामन्यादरम्यान सनरायझर्स हैदराबादच्या आशिष नेहराने एक नवा विक्रम केला.त्याने बॅंगलोरच्या शेन वॉट्सन आणि श्रीनाथ अरविंदला बाद करत दोन विकेट घेतल्या. यासोबत आयपीएलमध्ये 100 विकेट घेणारा पहिला डाव्या हाताचा गोलंदाज बनण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला. 83 सामन्यांमध्ये नेहराने हा विक्रम आपल्या नावे केला. या सामन्यात नेहराने 4 षटकात 42 धावा देऊन 2 विकेट घेतल्या.  
 
2008 पासून नेहरा आयपीएलमध्ये खेळत आहे. पहिल्या आयपीएलमध्ये  तो मुंबई इंडियन्सच्या संघाकडून खेळला होता. त्यानंतर त्याला दिल्ली डेअर डेव्हिल्सने विकत घेतलं. चौथ्या सत्रात तो पुणे वॉरिअर्सने विकत घेतलं होतं पण जखमी झाल्यामुळे तो पूर्ण सत्रात खेळू शकला नाही. दोन सत्रांनंतर तो पुन्हा दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून खेळायला लागला. त्यानंतर 2014 मध्ये चेन्नई सुपर किंग्सनेे त्यांना 2 कोटी रूपयांना विकत घेतलं. सीएसकेच्या संघावर बंदी आल्यानंतर सनरायझर्स हैदराबाद संघाने नेहराला साडे पाच कोटी रूपयांत विकत घेतलं. नेहरा आतापर्यंत एकूण 5 संघांकडून खेळला आहे.      
 
हैदराबादचा आरसीबीला धक्का-

हैदराबाद : युवराज सिंग आणि मोइसेस हेन्रीक्स यांच्या धडाकेबाज अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या टिच्चून माऱ्याच्या जोरावर गतविजेत्या सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या दहाव्या सत्रात विजयी सलामी दिली. सुरुवातीपासून वर्चस्व राखलेल्या हैदराबादने रॉयल चँलेंजर्स बँगलोरला ३५ धावांनी लोळवत गुणांचे खाते उघडले. हैदराबादकडून खेळत असलेल्या अफगाणिस्तानच्या रशिद खानने अचूक मारा करताना आपली छाप पाडली. धडाकेबाज अर्धशतक झळकावलेल्या युवराजला सामनावीराने गौरविण्यात आले.

राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी मिळाल्यावर आरसीबीपुढे विजयासाठी २०८ धावांचे भलेमोठे आव्हान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा डाव १७२ धावांत गारद झाला. या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आरसीबीचा एकही फलंदाज फारशी चमक दाखवू शकला नाही. विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स या स्टार्सच्या अनुपस्थितीमध्ये संघाची मदार ख्रिस गेलवर अधिक होती. गेलने सुरुवातीला फटकेबाजी करुन बंगळुरुच्या आशा उंचावल्या होत्या. मात्र, नंतर बेन कटिंगच्या अप्रतिम गोलंदाजीवर तो सातत्याने चकला. यामुळे गेल काहीसा दडपणाखाली आला आणि याचा फायदा दीपक हूडाने घेत त्याला तंबूचा रस्ता दाखवला. गेलने २१ चेंडूत २ चौकार व ३ षटकारांसह ३२ धावा केल्या.

ट्राविस हेड (३०) आणि केदार जाधव (३१) यांनी संघाकडून झुंज दिली. परंतु, हे दोघेही बाद झाल्यानंतर बंगळुरुकडून फारसा प्रतिकार झाला नाही. कर्णधार शेन वॉटसनने काहीवेळ झुंज दिली, परंतु आक्रमणाच्या नादात तो झेलबाद झाला. आशिष नेहरा, भुवनेश्वर कुमार आणि अफगाणिस्तानचा रशिद खान यांनी प्रत्येकी २ बळी घेत बंगळुरुला नमवले.

तत्पूर्वी, हैदराबादने हेन्रीक्स आणि युवराज या अष्टपैलू खेळाडूंच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर २० षटकांत २०७ मजबूत मजल मारली. कर्णधार डेव्हिड वॉर्नरने आक्रमक सुरुवात करुन दिली. मात्र, तो लगेच मनदीप सिंगकडे झेल देत तंबूत परतला. यानंतर शिखर धवन आणि हेन्रीक्स यांनी सुत्रे आपल्याकडे घेतली. एकेरी व दुहेरी धावा घेतानाच धावफलक हलता ठेवला. दोघेही स्थिर झाल्यावर त्यांनी चौकार, षटकारांची आतषबाजी केली. धवनने ३१ चेंडूत ४० धावा केल्या, तर हेन्रीक्स याने ३७ चेंडूत ५२ धावा केल्या.

स्टुअर्ट बिन्नीने आरसीबीला मोठे यश मिळवून देताना धवनला बाद केले. त्यानंतर युवराजचा धडाका सुरू झाला. त्याने २३ चेंडूत अर्धशतक करताना आयपीएलमध्ये जलद अर्धशतक ठोकले. त्याने २७

चेंडूत ६२ धावा करताना ७ चौकार व ३ षटकार ठोकले. बेन कटिंगने वॉटसनला दोन षटकार लगावत संघाला दोनशेचा आकडा पार करून दिला. दीपक हुड्डाने १२ चेंडूत १६ तर कटिंग्जने ६ चेंडूत १६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)

रशिद खानची चमक

या सामन्यात आफगाण खेळाडू रशिद खानने सर्वांचे लक्ष वेधले. आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अफगाण खेळाडू ठरलेल्या रशिदने अचूक फिरकी मारा करत आरसीबीच्या बलाढ्य फलंदाजीला जखडवून ठेवले.

सलामीवीर मनदीप सिंग आणि आक्रमक ट्राविस हेड यांना बाद करुन त्याने आरसीबीच्या फलंदाजीला खिंडार पाडले. रशिदने घेतलेल्या महत्त्वपूर्ण बळींमुळे आरसीबीचे फलंदाज दडपणाखाली आले. याचा फायदा हैदराबादच्या इतर गोलंदाजांनी घेत सामन्यावर कब्जा केला.

>संक्षिप्त धावफलक

सनरायझर्स हैदराबाद : २० षटकात ४ बाद २०७ धावा (युवराज सिंग ६२, मोइसेस हेन्रीक्स ५२, शिखर धवन ४०; स्टुअर्ट बिन्नी १/१०, युझवेंद्र चहल १/२२) वि.वि. रॉयल चँलेंजर्स बँगलोर : १९.४ षटकात सर्वबाद १७२ धावा (ख्रिस गेल ३२, केदार जाधव ३१, ट्राविस हेड ३०; भुवनेश्वर कुमार २/२७, रशिद खान २/३६, आशिष नेहरा २/४२)