शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नेहरा, भुवनेश्वरने दिलेल्या टिप्सची मदत झाली : सरन

By admin | Updated: June 21, 2016 19:23 IST

स्विंग गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांनी दिलेल्या टीप्सची मदत झाली

ऑनलाइन लोकमत

हरारे, दि. 21 -  स्विंग गोलंदाजी करण्यासाठी अनुभवी आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांनी दिलेल्या टीप्सची मदत झाली, अशी प्रतिक्रिया टी-२० मध्ये संस्मरणीय पदार्पण करणारा भारताचा युवा वेगवान गोलंदाज बरिंदर सरनने व्यक्त केली. सरनने १० धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. पदार्पणाच्या लढतीत टी-२० आंतरारष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय गोलंदाजाची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. सरनच्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने दुसऱ्या टी-२० लढतीत झिम्बाब्वेचा डाव ९ बाद ९९ धावांत रोकला आणि त्यानंतर १० गडी राखून सहज विजय मिळवला. सरन म्हणाला,ह्यमला रिव्हर्स स्विंग व सीम पोझिशनबाबत आशीष नेहरा व भुवनेश्वर कुमार यांच्याकडून माहिती मिळाली. दडपणाला कसे सामोरे जाता, हे महत्त्वाचे असते. टी-२० मध्ये गोलंदाजाला प्रतिस्पर्धी फलंदाजाची शैली झटपट समजून घ्यावी लागते आणि वेग व टप्पा यामध्ये बदल करावा लागतो.सरन पुढे म्हणाला, हे संस्मरणीय पदार्पण ठरले. पदार्पण संस्मरणी ठरावे, असे स्वप्न सर्वच बघत असतात. टी-२० मध्ये पदार्पणात माझी कामगिरी सर्वोत्तम ठरल्याचा अभिमान आहे.भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडून भारतातर्फे टी-२० व वन-डे कॅप मिळाल्यामुळे सरनने आनंद व्यक्त केला. सरन म्हणाला, माहीकडून वन-डे आंतररष्ट्रीय व टी-२० कॅप मिळणे मोठी बाब आहे. हे स्वप्न साकार झाल्याप्रमाणे आहे.सुरुवातीला सरनला बॉक्सिंगची आवड होती, पण कारकिर्दीसाठी क्रिकेटची निवड केल्याचे त्याला दु:ख नाही. सरन म्हणाला, बॉक्सिंगपेक्षा क्रिकेटची निवड करण्याचा निर्णय फार पूर्वीच घेतला. त्याचे मला कुठलेच दु:ख नाही. मी त्यानंतर बॉक्सिंगबाबत कधीच विचार केला नाही आणि हा योग्य निर्णय असल्याची प्रचिती आली. ज्यावेळी पंजाबतर्फे प्रथम श्रेणी क्रिकेट खेळण्याची संधी मिळाली, त्यावेळी माझा निवड योग्य असल्याचे वाटले. बॉक्सिंगचे क्षेत्र मर्यादित आहे. २३ वर्षीय वेगवान गोलंदाज आताही टीव्हीवर बॉक्सिंग बघतो. विशेषत: त्याला विजेंदरची व्यावसायिक बॉक्सिंग लढत बघायला आवडते.