शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

नीरज चोप्राने रचला इतिहास, लॉसने डायमंड लीग जिंकणारा पहिला भारतीय ठरला, पाहा VIDEO

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2022 08:51 IST

Neeraj Chopra : 24 वर्षीय नीरज चोप्राने हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केली.

नवी दिल्ली : ऑलिम्पिक चॅम्पियन भालाफेकपटू नीरज चोप्राने (Neeraj Chopra) शुक्रवारी पुन्हा एकदा इतिहास रचला. लॉसने डायमंड लीग (Lausanne Diamond League) स्पर्धेत विजेतेपद जिंकणारा नीरज चोप्रा पहिला भारतीय ठरला. तसेच, त्याने झुरिच येथील 7 आणि 8 सप्टेंबर रोजी डायमंड लीगची अंतिम फेरी गाठली आहे. ही कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. यासोबतच तो 2023 मध्ये हंगेरी येथील बुडापेस्टमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

24 वर्षीय नीरज चोप्राने हे विजेतेपद मिळवण्याच्या पहिल्याच प्रयत्नात 89.08 मीटर अंतरावर भालाफेक केली. त्याच्या कारकिर्दीतील हा तिसरा सर्वोत्तम प्रयत्न आहे. हरियाणातील पानिपत येथील रहिवासी असलेला नीरज चोप्रा डायमंड लीगचे विजेतेपद जिंकणारा पहिला भारतीय ठरला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या धरतीवर 24 जुलै रोजी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ऐतिहासिक रौप्य पदक पटकावताना नीरज चोप्राला दुखापत झाली होती. त्यामुळेच तो बर्मिंगहॅम येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सहभागी होऊ शकला नव्हता. चोप्राला वैद्यकीय पथकाने चार आठवड्यांच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. म्हणूनच भारताचा गोल्डन बॉयला बहुचर्चित स्पर्धेला मुकावे लागले होते.

15 वर्षीय लिंथोई चनाम्बामने ऐतिहासिक ज्युदो सुवर्णपदक जिंकलेभारताच्या लिंथोई चनाम्बामने बोस्निया-हर्जेगोविना येथील साराजेव्हो येथे झालेल्या जागतिक कॅडेट ज्युडो चॅम्पियनशिपमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत कोणत्याही वयोगटात पदक जिंकणारी लिंथोई ही देशातील पहिला खेळाडू ठरली. मणिपूरच्या 15 वर्षीय खेळाडूने महिलांच्या 57 किलो वजनी गटात ब्राझीलच्या बियान्का रेसला हरवून अव्वल स्थान पटकावले. भारतीय क्रीडा प्राधिकरणाने (साई) या युवा खेळाडूच्या कामगिरीची माहिती दिली. जुलैमध्ये लिंथोईने बँकॉकमध्ये आशियाई कॅडेट आणि ज्युनियर ज्युडो चॅम्पियनशिप 2022 मध्ये 63 किलो गटात सुवर्णपदक जिंकून भारताचे खाते उघडले होते.

टॅग्स :Neeraj Chopraनीरज चोप्रा