शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित शाह जिल्हाधिकाऱ्यांना फोन करून धमकावत आहेत"; काँग्रेसच्या आरोपाची निवडणूक आयोगाकडून दखल
2
इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधी म्हणाले, "सिद्धू मुसेवालालाचे गाणे ऐका, कळेल.."
3
मनोज तिवारी आणि कन्हैया कुमार यांच्यात कोण जिंकणार?; एक्झिट पोलने सांगितला आकडा
4
दिग्गज फुटबॉलपटू बायचुंग भुतिय यांना 'रेड कार्ड', राजकीय मैदानात मतदारांनी पुन्हा नाकारले...
5
एक्झिट पोलमध्ये भाजपला प्रचंड बहुमत; प्रशांत किशोर यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'माझे एज आहे 17, रस्त्यावर लोकांना खतरा' पोर्शे कार अपघातावर आरजे मलिष्काचं नवं रॅप साँग ऐकलंत का?
7
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अरुणाचल प्रदेशमध्ये डंका; दोन्ही राज्यातील विधानसभा निवडणुकीत 'हे' पक्ष आघाडीवर
8
Arvind Kejriwal : "जेलमध्ये तुमचे केजरीवाल..."; सरेंडर करण्याआधी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शेड्यूल
9
"फोडाफोडीचं राजकारण जनतेला अमान्य’’, एक्झिट पोलनंतर एकनाथ खडसेंचा भाजपाला टोला
10
आम्हाला फक्त भारताविरूद्धच नाहीतर वर्ल्ड कप देखील जिंकायचाय - बाबर आझम
11
"कठीण प्रसंग येतातच, मी पळ काढणार नाही", Hardik Pandya ने सांगितला खडतर प्रवास
12
कंगना, कन्हैया, संबित पात्रा, अन्नामलाई, विशाल पाटील यांच्या हॉट सिटवर असा आहे एक्झिट पोल
13
'मालवणच्या समुद्रकिनारी तब्बूचा फोन...', छाया कदम यांनी सांगितला मजेशीर किस्सा
14
इंडिया आघाडीला महाराष्ट्र, बिहार, कर्नाटकात धक्कादायक आकडे; एक्झिट पोलमध्ये विरोधी पक्षांनी 'या' राज्यात मारली बाजी
15
अभिनेता आस्ताद काळेने लिव्ह-इन रिलेशनशीप अन् पीजीमध्ये राहणाऱ्या तरुणाईला दिला 'हा' मोलाचा सल्ला
16
टीम इंडियाचा स्टार अय्यर अडकला विवाहबंधनात; 'श्रुति'ला बनवले आयुष्याचा जोडीदार
17
"टूथब्रश न्यायला विसरु नका कारण..."; तुरुंगात जाण्यापूर्वी केजरीवालांना परेश रावलचा सल्ला
18
चारशे पार सोडा, मोदी आणि एनडीएला २५० जागाही मिळणार नाहीत, या एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज 
19
दारू पिऊन गाडी चालवू नका! पुण्यात २ दिवसांत १५४ वाहनचालकांवर ‘ड्रंक ॲण्ड ड्राइव्ह’ची कारवाई
20
PICS : षटकारांचा पाऊस! अमेरिकेच्या शिलेदारानं रचला इतिहास; सलामीच्या सामन्यात यजमानांचा दबदबा

नटखट धोनी

By admin | Published: December 31, 2014 1:26 AM

प्रवृत्तीने शांत; पण धोरणाने तितकाच आक्रमक असलेला धोनी ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखला जात असला, तरी आपल्या संघातील सहकाऱ्यांना तो वेळोवेळी चांगलेच फटकारतो.

महेंद्रसिंग धोनी... एक असं नाव ज्याने आपल्या कृतीने, कर्तृत्त्वाने आणि शैलीने भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलवून टाकला. प्रवृत्तीने शांत; पण धोरणाने तितकाच आक्रमक असलेला धोनी ‘कॅप्टन कुल’ म्हणून ओळखला जात असला, तरी आपल्या संघातील सहकाऱ्यांना तो वेळोवेळी चांगलेच फटकारतो. यामध्ये काहीवेळा कठोर शब्दांचा प्रयोग असतो, तर काहीवेळा शाब्दिक कोटीही असते. यष्टीजवळ उभा असल्यानंतर त्याचे बोलणे अनेकदा स्टम्प माईकमध्ये रेकॉर्ड झालेले असते. त्यातील काही अफलातून किस्से. मुरली विजय ‘आपला’च आहेदुसऱ्या एका प्रसंगात धोनीने जडेजाला अशाच कानपिचक्या दिल्या आहेत. जडेजाने आॅफस्टम्पवर मारा करावा, असे धोनीला वाटत होते; पण जडेजा लेगसाईडकडे बॉल टाकत होता. तेव्हा धोनीने जडेजाला सांगितले, ‘मुरली विजय अपनाही फिल्डर है, उसे कॅच लेने के लिए ही आगे रखा है, आॅफ में बॉल फेंक’’.कॉमेंट्रीची हौस (२९ एप्रिल २0१४)याच कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा चांगली गोलंदाजी करीत होता. त्याला प्रोत्साहन देताना त्याने कॉमेंट्रेटरच्या स्टाईलमध्ये ‘... और जोरदार बॉलिंगका प्रदर्शन करते हुऐ रवींद्र जडेजा ’, अशी कॉमेंट केली. यावर सगळेच हसू लागले.जबरदस्त आत्मविश्वास (२0१३)मोहाली कसोटीत आॅस्ट्रेलियन सलामीवीरांनी मोठी भागीदारी केली होती. त्यानंतर मायकेल क्लार्क मैदानावर आला. त्यावेळी रवींद्र जडेजा गोलंदाजी करीत होता. त्याने जडेजाला सांगितले, ‘पेहला बॉल थोडा तेज डालना, ये पेहलीही बॉल पे आगे बडेगा’, क्लार्कचे तंत्र फिरकी विरोधात तोकडे आहे, म्हणून तो पहिल्या चेंडूवर पुढे सरसावून फिरकी गोलंदाजांना आपल्यावर वर्चस्व गाजवू न देण्याचा इशारा देणार याचा धोनीला अंदाज होता. जडेजाने त्याच्या सूचनेप्रमाणे पहिलाच चेंडू वेगात टाकला. क्लार्कही पुढे सरसावला; पण बॅटचा आणि बॉलचा स्पर्श झालाच नाही. उरलेले काम मग धोनीने शिताफीने केले. क्लार्क शून्यावर यष्टिचित होऊन तंबूत परतला. १८८ धावा(विरुद्ध पाकिस्तान. स्थळ : फैसलाबाद. वर्ष २००५) २००४-०५ मध्ये भारतीय संघ पाकिस्तान दौऱ्यावर असताना धोनीने फै सलाबाद कसोटीत झळकावलेले शतक ही त्याच्या कसोटी कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी म्हणावी लागेल. एकतर ही धोनीची केवळ पाचवी कसोटी होती आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शोएब अख्तर, मोहम्मद आसिफ, अब्दुल रझाक या जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना त्यांच्याच देशात सडेतोड उत्तर देत धोनीने क्रिकेटविश्वातील पंडितांचे लक्ष वेधून घेतले होते...पाकने पहिल्या डावात ५८८ धावांचा डोंगर उभारल्यानंतर भारताची अवस्था ५ बाद २८१ अशी झालेली... शतकवीर द्रविडसह सचिन, सेहवाग, लक्ष्मण आणि युवराज तंबूत परतलेले होते. पाक मोठी आघाडी घेणार, अशी चिन्हे होती. पण ‘झारखंड का छोरा’ धोनीने सगळे अंदाज धुळीला मिळवत १५३ चेंडूंत १४८ धावांची आक्रमक खेळी साकारली अन् भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावली. यादरम्यान त्याने सहाव्या गड्यासाठी इरफान पठाणसोबत २१० धावांची महत्वाची भागीदारी केली होती. या डावाच्या प्रारंभीच धोनीने दाखवलेली निर्भय आणि बेदरकार वृत्ती कौतुकास पात्र ठरली. दिग्गज फलंदाज बाद झाल्यानंतर खेळपट्टीवर आलेला नवोदित धोनी बचावात्मक पावित्रा घेईल, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रत्यक्षात घडले ते अगदीच विपरित होते. फलंदाजीला आल्याबरोबर धोनीने टॉप गिअर टाकत पाकच्या गोलंदाजांमध्येच दहशत पसरवली. भरात असलेल्या मोहम्मद आसिफच्या एकाच षटकात ३ चौकार लगावून धोनीने आपण दबावाला भीक घालत नसल्याचे दाखवून दिले. यानंतर त्याने फिरकीपटू दानीश कनेरियाला सलग २ गगनचुंबी षटकार खेचून दिमाखात अर्धशतक पूर्ण केले. ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण करणााऱ्या धोनीने त्यादरम्यान ७ चौकार आणि ३ षटकार लगावले होते. त्याच्या या हल्ल्याने पाकच्या माऱ्यातील हवाच निघून गेली होती. विशेष म्हणजे, धोनीचे हे पहिलेच कसोटी शतक अन् कारकिर्दीत भारताबाहेर झळकावलेले एकमेव!नाबाद ७६(विरुद्ध इंग्लंड. स्थळ : लॉडर््स. वर्ष २००७) या दौऱ्यातील पहिल्याच कसोटीत भारतावर ओढवलेली पराभवाची नामुष्की धोनीच्या अप्रतिम अर्धशतकामुळे टळली. भारताची अवस्था ५ बाद १४५ अशी नाजूक झालेली. वासीम जाफर-दिनेश कार्तिक या सलामी जोडीसह सचिन, कर्णधार द्रविड अन् गांगुलीदेखील माघारी परतलेले. पराभवाची केवळ औपचारिकता शिल्लक आहे, असेच वाटत होते. या क्षणी धोनी १५९ चेंडूंत नाबाद ७६ धावांची साहसी इनिंग खेळून गेला. त्याने अखेरपर्यंत किल्ला लढवत इंग्लंडला विजयापासून वंचित ठेवले. एकेक सहकारी तंबूत परतत असताना धोनीने भारताची लाज राखली. दिवसाची षटके संपली तेव्हा भारताने ९ बाद २८२ धावा केल्या होत्या. इंग्लिश समीक्षक तसे पक्के कर्मठ. कॉपी बुक स्टाईल खेळीवर त्यांचे भारी प्रेम. मात्र, त्यांच्या लेखनीनेही ‘रावडी’ धोनीवर कौतुकाचा वर्षाव केला. धोनीच्या या खेळीमुळे सामनावीर केवीन पीटरसनचे शतकदेखील झाकोळून गेले होते.धावा २२४ (विरुद्ध आॅस्ट्रेलिया. स्थळ : चेन्नई. वर्ष २०१३) २०१२-१३मध्ये इंग्लंड आणि आॅस्ट्रेलियात प्रत्येकी ४-०ने नामुष्कीजनक पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाचा आत्मविश्वास खालावला होता. अशा परिस्थितीत चेन्नई कसोटीतील विजयाने भारतीय संघाला दिलासा मिळाला. पहिल्या कसोटीत कांगारूंनी पहिल्या डावात ३८० धावा केल्यानंतर विराट कोहली आणि भुवनेश्वर कुमारच्या साथीने आॅस्ट्रेलियाचा मारा बोथट करीत भारताला सामन्यात वर्चस्व मिळवून दिले. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या कॅ प्टन कूलने शतकवीर विराटसोबत (१०७) पाचव्या गड्यासाठी १२८ धावांची भागीदारी करीत भारताला तीनशेपार नेले. खरी कमाल केली ती धोनी-भुवी यांच्यातील भागीदारीने. या दोघांनी नवव्या गड्यासाठी १४० धावांची भागीदारी करून कांगारूंच्या तोंडचे पाणी पळवले. यात भुवीचा वाटा होता केवळ ३८ धावांचा. धोनीने २६५ चेंडूंत २२४ धावांची झकास खेळी साकारताना ६ षटकार आणि २४ चौकारांची उधळण केली. त्याच्या द्विशतकामुळेच भारताला पहिल्या डावात १९२ धावांची आघाडी घेणे शक्य झाले. यानंतर दबावाखाली आलेल्या आॅस्ट्रेलियाचा दुसरा डाव २४१ धावांवर संपवून भारताने विजयासाठी आवश्यक ५० धावा करून सामना जिंकला.धावा ७१ (विरुद्ध इंग्लंड. स्थळ : ओल्ड ट्रॅफोर्ड. वर्ष २०१४) पाच कसोटींच्या मालिकेतील हा चौथा सामना. यात पाहुणा भारतीय संघ एक डाव ५४ धावांनी पराभूत झाला असला तरी पहिल्या डावात धोनीने साकारलेली ७१ धावांची खेळी समीक्षकांची दाद घेऊन गेली. या खेळीत धोनीने आपल्या नैसर्गिक फटकेबाजीला वेसण न घालता फलंदाजी केली. चांगल्या चेंडूंना योग्य तो सन्मान देण्याच्या भानगडीत न पडता त्याने गोलंदाजांवर हल्ला चढवला. धोनीची बॅट चेंडूवर हातोड्यासारखी बरसत होती. छाती आणि खांद्यांचा वेध घेऊ पाहणाऱ्या चेंडूंना त्याने लेट कटद्वारे उत्तर दिले. १३३ चेंडूंच्या या खेळीत धोनीने १५ चौकार लगावले. सहाव्या षटकातच भारताची ४ बाद ८ अशी वाताहत झाली होती. मुरली विजय (०), गंभीर (४), पुजारा (०), कोहली (०), जडेजा (०) हे मोहरे स्वस्तात गळाल्यानंतर धोनीने दिलेली झुंज एकाकी ठरली. भारताचा तब्बल सहा फलंदाजांनी भोपळा न फोडण्याचा पराक्रम (!) केला, तोच हा डाव!धावा ११०(विरुद्ध श्रीलंका. स्थळ : अहमदाबाद. वर्ष २००९) २००८मध्ये श्रीलंकेतील मालिका पराभवाची परतफेड करण्याच्या इराद्याने अहमदाबाद कसोटीत उतरलेल्या यजमानांना वेगवान गोलंदाज चामरा वेलगेदरा याने आठव्या षटकातच ४ बाद ३२ असा फेस आणला होता. धोनी द्रविडच्या मदतीला आला. एरवी बचावात्मक फलंदाजी करणारा द्रविड त्या दिवशी चक्क आक्रमक मूडमध्ये होता. या दोघांनी सहाव्या गड्यासाठी २२४ धावांची भागीदारी करीत मोठी धावसंख्या उभारून दिली. या आनिर्णीत कसोटीत धोनीचे शतक महत्वपूर्ण ठरले. यानंतर पुढचे दोन्ही सामने जिंकत भारताने मालिकाविजय मिळवला आणि जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावले. पुजाराची ‘टाळी’न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात रवींद्र जडेजा चेंडू स्पीन करण्याऐवजी वेगात टाकण्याचा प्रयत्न करीत होता; पण धोनीने त्याला चेंडू टर्न कर आपण स्लीपमध्ये फिल्डर लावला असल्याची आठवण अशी करून दिली ती त्याच्या कायमची लक्षात राहील. जडेजाला तो म्हणतो, ‘ये घुमेगा इसलिए पुजाराको स्लीपमें खडा किया है, ये इधर टाली बजाने के लिए नही है’.उमेशला सूचनाहैदराबाद येथे २0१२ला न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या सामन्यात जेम्स फ्रँकलीन आणि क्रुगर वॅन वॅक हे फलंदाजी करीत होते. फ्रँकलिन उंचापुरा आहे, त्यामानाने वॅन वॅक छोटा आहे. त्यावरून उमेश यादवला सूचना देताना धोनी म्हणतो, ‘उमी, अगर छोटा स्ट्राईकपर है, तो एक ओव्हर, नही तो बस’, वॅन वॅक स्ट्राईकवर असेल तर तुला आणखी एक ओव्हर मिळेल, अन्यथा नाही, असे त्याला सूचवायचे होते.श्रीसंतची खेचली (२९ एप्रिल २0१४)कसोटी सामन्यात क्षेत्ररक्षण करीत असताना एस. श्रीसंत त्याला सांगितलेल्या जागेपासून सारखा दुसरीकडे जात होता. हे धोनीच्या लक्षात आल्यावर धोनीने त्याला, ‘ओए श्री, उधर तेरी गर्लफ्रेंड नही है, इधर आ जा थोडा ’, असे खोचकपणे फटकारले. यानंतर मात्र श्रीसंतने जागा सोडली नाही. गोलंदाजांना मोकळीकअगदी अलीकडचे उदाहरण म्हणजे, ब्रिस्बेन कसोटीत आक्रमक फिल्डिंग लावताना धोनीने गोलंदाजांनाही पूर्णपणे मोकळीक दिली होती. त्याने इशांतला ‘तू जहाँ चाहता है उधर बॉल डाल, मै तेरेको और एक फिल्डर लगवा देता हूँ ’ असे म्हटल्याचे स्टम्प मायक्रोफोनमधून स्पष्ट ऐकू आले. यावरून त्याने गोलंदाजांना त्यांची नैसर्गिक गोलंदाजी करण्यास पूर्णपणे मोकळीक दिली होती, हे दिसून येते.‘घंटी’ बजाओमैदानावर प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजांचा उल्लेख धोनी सांकेतिक नावाने करतो. इंग्लंडचा फलंदाज इयान बेल याला तो ‘घंटी’ म्हणतो. २0१२ साली एका कसोटी सामन्यात तो ब्रेकपूर्वी बेलला बाद करायचे आहे, असे सूचविताना ‘घंटी को लेके जाएंगे’, असे म्हणतो.