शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय शरीरसौष्ठव : महाराष्ट्राच्या मोहम्मद आमिरचे सुवर्ण थोडक्यात हुकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 21:53 IST

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले.

- रोहित नाईकविशाखापट्टणम : अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले. उत्कृष्ट सादरीकरण आणि शानदार शरीरयष्टीच्या जोरावर यजमान आंध्र प्रदेशच्या के. श्रीनिवास याने आमिरला मागे टाकले. 

इंडियन बॉडीबिल्डींग फेडरेशनच्य (आयबीबीएफ) प्रथमच विशाखापट्टणम येथील गुरजाडा कलाक्षेत्रम येथे सुरु असलेल्या हिल्स, वॅलीस आणि माऊंटन्स (एचव्हीएम) या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या मोहम्मद आमिरने ६० किलो वजनीगटात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सुवर्ण पदक पटकावण्यापासून तो थोडक्यात अपयशी ठरला. प्राथमिक फेरीमध्ये २७ सहभागी खेळाडूंमधून वर्चस्व राखत दिमाखात अंतिम फेरी गाठलेल्या आमिरकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. त्याला प्रेक्षकांकडूनही मोठा पाठिंबा मिळाला. मात्र, मोक्याच्यावेळी शानदार सादरीकरण केलेल्या श्रीनिवास याने काही गुणांच्या जोरावर बाजी मारत सुवर्ण पदकावर नाव कोरले. श्रीनिवासच्या धडाक्यापुढे अखेर आमिरला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. 

त्याचवेळी, आंध्र प्रदेशच्याच एस. के. रेहमान याने कांस्य पदकावर कब्जा केला. तसेच सोहम सरकार आणि सुनंदन बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या खेळाडूंना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. याआधी झालेल्या ५५ किलो वजनी गटातूनही महाराष्ट्र आणि विदर्भाच्या शरीरसौष्ठवपटूंनी छाप पाडताना लक्षवेधी कामगिरी केली. 

पुरुषांच्या ८ वजनी गटामध्ये आणि महिलांच्या गटामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत प्रामुख्याने आदिवासी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेतील पुरुष व महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे ‘एचव्हीएम मिस्टर इंडिया’ आणि  ‘एचव्हीएम मिस इंडिया’ किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी २५० खेळाडूंपैकी ७० खेळाडू आदिवासी समाजाचे आहेत.   

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठव