शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

नासिर जमशेदची पीसीबीला धमकी

By admin | Updated: May 20, 2017 03:24 IST

निलंबित कसोटी फलंदाज नासिर जमशेद याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आपल्याला स्पॉट फिक्सिंगमध्ये गोवण्यासाठी

कराची : निलंबित कसोटी फलंदाज नासिर जमशेद याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला न्यायालयात खेचण्याची धमकी दिली आहे. पीसीबी आपल्याला स्पॉट फिक्सिंगमध्ये गोवण्यासाठी साक्षीदार म्हणून सहकारी खेळाडूंवर दडपण आणत असल्याचा त्याचा आरोप आहे. पाककडून दोन कसोटी, ४८ वन डे आणि १८ टी-२० सामने खेळलेल्या जमशेदने आपण ब्रिटनमध्ये असताना इकडे मायदेशात पीसीबीने सहकारी खेळाडूंवर खोटी साक्ष देण्यासाठी दडपण आणल्याचा आरोप केला. सोशल मीडियावरील व्हिडिओ संदेशात जमशेद म्हणाला, ‘पीसीबी माझ्यासोबत सूडभावनेने वागत आहे. बोर्डातील अधिकारी माझ्याविरुद्ध खोटी साक्ष देण्यासाठी सहकारी खेळाडूंवर दडपण आणत आहेत. माझी बदनामी व्हावी, असे पीसीबीला वाटते.’ पाकिस्तान सुपर लीगमधील स्पॉट फिक्सिंग प्रकरणी ज्या सहाजणांना निलंबित करण्यात आले त्यात जमशेदचा देखील समावेश होता. याप्रकरणी कायदेशीर तज्ज्ञांचा आपण सल्ला घेत असल्याचे सांगून जमशेद पुढे म्हणाला, माझ्याविरुद्ध काही साक्षीपुरावे असल्यास ते मीडियापुढे ठेवावेत असे पीसीबीला मी आव्हान देत आहे. अशा प्रकारचे तथ्यहीन आरोप माझ्या खासगी आयुष्यावर विपरीत परिणाम करणारे ठरत आहेत. (वृत्तसंस्था) आयसीसीने पीसीबीला सावध केले होते : फ्लॅनगनपाकिस्तान सुपर लीगमधील संभाव्य स्पॉट फिक्सिंगबाबत आपण पीसीबीचे आधीच लक्ष वेधले असल्याचा खुलासा आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाचे प्रमुख रॉनी फ्लॅनगन यांनी केला आहे. आयसीसीच्या एसीयू पथकाने फेब्रुवारीत हा खुलासा केल्याचा दावा पाकने केला होता. याच्याविरुद्ध फ्लॅनगन यांनी लाहोरमध्ये पत्रकारांशी बोलताना ब्रिटनमधील राष्ट्रीय गुन्हेविरोधी एजन्सीने दिलेल्या माहितीच्या आधारे आपण पीसीबीच्या भ्रष्टाचार पथकाला ही सूचना दिली होती. नंतर पीसीबीने फिक्सिंगच्या चौकशीसाठी तीन सदस्यांची समिती नेमली तेव्हा पीसीबीकडून साक्षीदार या नात्याने फ्लॅनगन स्वत: उपस्थित होते. ही समिती सहा खेळाडूंच्या निलंबनासोबतच स्थापन झाली. बोर्डाने याच आठवड्यात अष्टपैलू खेळाडू मोहम्मद नवाज याच्यावर देखील दोन महिन्यांची बंदी घातली. मागच्या वर्षीच्या आॅस्ट्रेलिया दौऱ्यात सट्टेबाजांनी आपल्याशी संपर्क केल्याची कबुली त्याने दिली होती.