शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

T-20 मधलं पहिलं त्रिशतक भारतीयाच्या नावावर

By admin | Updated: February 7, 2017 22:43 IST

क्रिकेटच्या जगतात अनेकांच्या नावावर दररोज नवनवे रेकॉर्ड होतच असतात

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 7 - क्रिकेटच्या जगतात अनेकांच्या नावावर दररोज नवनवे रेकॉर्ड होतच असतात. मात्र दिल्लीच्या एका फलंदाजानं या सगळ्यांवर कडी करत क्रिकेटच्या विश्वात नवा इतिहास रचला आहे. मोहित अहलावत याने अवघ्या ७२ चेंडूंत त्रिशतकी खेळी करत क्रिकेटच्या मैदानात नवा विक्रम रचला आहे. विशेष म्हणजे या सामन्यात मोहितने फलंदाजीचा शानदार नजराणा पेश करत 39 षटकार आणि 14 चौकार लगावले आहेत. या अलौकिक यशानंतर मोहित टी-20 क्रिकेटमध्ये त्रिशतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. 21 वर्षांच्या मोहित अहलावतनं हा चमत्कार करून दाखवला आहे. दिल्लीत मावी इलेव्हन आणि फ्रेंड्स इलेव्हन यांच्या दरम्यान टी-20चा हा सामना रंगला होता. मोहित मावी इलेव्हन या संघाकडून खेळत होता. मोहितनं शेवटच्या षटकात पाच चेंडूंवर लागोपाठ 5 षटकार मारले आहेत. मोहितमुळे मावी इलेव्हनने 20 षटकांत 416 धावांची आघाडी उभी केली. क्रिकेटजगतात सर्वाधिक धावसंख्या वेस्ट इंडिजच्या ख्रिस गेलच्या नावे आहेत. त्यानं आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून 175 धावा काढल्या होत्या. मोहित दिल्लीच्या लाल बहादूर शास्त्री अकॅडमीतून शिक्षणाचे धडे गिरवतो आहे. याच अकॅडमीतून गौतम गंभीर आणि अमित मिश्रानं प्रशिक्षण घेऊन क्रिकेटमध्ये यश संपादन केलं आहे.