शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडिओ काढला तरी कुणी? मंत्री, परममित्र की...? चर्चांना उधाण
2
आणखी एका मंत्र्याचा आज राजीनामा?; वादामुळे महायुती सरकार बॅकफूटवर, अजित पवारांची कोंडी
3
Jagdeep Dhankhar: भारताच्या उपराष्ट्रपतींना पगार किती मिळतो? पद सोडल्यानंतरही या सुविधा मिळतात
4
'मी दबावाखाली काम करत नाही'; जगदीप धनखड यांनी असे का म्हटले?, राजीनाम्यानंतर व्हिडीओ व्हायरल
5
आज न्यायाची हत्या झाली... बॉम्ब स्फोटातील जखमीने व्यक्त केली खंत, निर्णयाने धक्का
6
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
7
"ऑपरेशन झाल्यावर २९ गाठी आढळल्या.."; अभिनेते विजय पटवर्धन यांच्या पत्नीला झालेला कॅन्सर, सांगितला अनुभव
8
Stock Market Today: ३२७ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; Zomato मध्ये बंपर तेजी, बँक आणि रियल्टीमध्ये तेजी
9
मुंबई बॉम्बस्फोट: ९ वर्षे जगण्यासाठी झुंजला पराग सावंत, कुटुंबियांना आजही दु:ख
10
राजनाथ सिंह यांच्याकडे राजकीय हालचालींना वेग; भाजपा खासदाराच्या कोऱ्या कागदावर का घेतल्या सह्या?
11
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये फक्त ४ वर्ष भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरंटी, आणखीही बेनिफिट्स मिळणार
12
चातुर्मासातील पहिली शिवरात्री: शिवपूजन कसे करावे? व्रताचरणाची सोपी पद्धत; मिळेल सुख-लाभ!
13
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
14
२ शत्रू ग्रहांची युती: ९ राशींचे कल्याण, दुपटीने लाभ; पद-पैसा वृद्धी, राजयोगांचा वरदान काळ!
15
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
16
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
17
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
18
राज्य सरकार, तपासयंत्रणांना मोठा धक्का, गुन्हे सिद्ध करण्यात सरकारी वकील ठरले अपयशी : उच्च न्यायालय
19
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
20
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 

नदालची तुफानी घोडदौड

By admin | Updated: May 27, 2016 03:55 IST

क्ले कोर्टचा बादशाह व नऊ वेळचा विजेता स्पेनच्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फाकुंडो बागनिसचा ३-० असा फडशा पाडून दिमाखात फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.

पॅरिस : क्ले कोर्टचा बादशाह व नऊ वेळचा विजेता स्पेनच्या राफेल नदालने अर्जेंटिनाच्या फाकुंडो बागनिसचा ३-० असा फडशा पाडून दिमाखात फ्रेंच ओपनच्या तिसऱ्या फेरीत प्रवेश केला. विशेष म्हणजे नदालने यासह आपल्या कारकिर्दीतील २००वा ग्रँडस्लॅम विजय नोंदवला. दुसरीकडे अव्वल खेळाडू सर्बियाच्या नोव्हाक जोकोविचने फ्रेंच ओपनमधील ५०वा विजय मिळवून तिसरी फेरी गाठली. ग्रँडस्लॅममध्ये २०० विजय मिळवणारा नदाल आठवा पुरुष खेळाडू ठरला. क्ले कोर्टवरील आपले वर्चस्व सिद्ध करताना नदालने बागनिस विरुद्ध ६-३, ६-०, ६-३ असा दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या सेटमध्ये नदालने एकही गेम न गमावता आघाडी घेतली. चमकदार सुरुवात केलेल्या बागनिसने पहिल्याच सेटमध्ये नदालची सर्विस भेदली. मात्र, यानंतर तो नदालविरुद्ध झगडताना दिसला. त्याचवेळी, करियर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या जोकोविचने बेल्जियमच्या स्टीव डार्सिसला ७-५, ६-३, ६-४ असे पराभूत करुन फ्रेंच ओपनमध्ये आपला ५०वा विजय मिळवला. जोकोचा पुढील फेरीत पहिल्यांदाच ग्रँडस्लॅमची तिसरी फेरी गाठलेल्या ब्रिटनच्या अलजाज बेडेने विरुद्ध लढत होईल.अन्य लढतीत सातव्या मानांकीत थॉमस बेर्दिच (झेक प्रजासत्ताक) याने ट्यूनिशियाच्या मालेक जाजिरीचे आव्हान ६-१, २-६, ६-२, ६-४ असे परतावून तिसऱ्या फेरीत आगेकूच केली. स्वित्झर्लंडच्या गतविजेत्या स्टेनिसलास वावरिंकाने जपानच्या टारो डॅनियलचा सरळ तीन सेटमध्ये ७-६, ६-३, ६-४ असा धुव्वा उडवला.याआधी ब्रिटनच्या अ‍ॅण्डी मरेला मात्र आगेकूच करण्यासाठी तब्बल ५ सेटपर्यंत झुंजावे लागले. १६४ व्या क्रमांकावर असलेल्या वाईल्ड कार्ड आधारे प्रवेश मिळविलेला स्थानिक खेळाडू मथायस बोर्ग्यू याने मरेला जबरदस्त झुंजवले. मात्र, मरेने अनुभवाच्या जोरावर मोक्याच्यावेळी खेळी उंचावताना ६-२, २-६, ४-६, ६-२, ६-३ असा संघर्षमय विजय मिळवला. आॅस्टे्रलियाचा १७व्या मानांकीत निक किर्गियोसने सहज आगेकूच करताना हॉलंडच्या इगोर सिसलिगचे आव्हान ६-३, ६-२, ६-१ असे संपुष्टात आणले. तर कॅनडच्या आठव्या मानांकित मिलोस राओनिकने एड्रियन मिनारिओला ६-१, ७-६, ६-१ असे नमविले. (वृत्तसंस्था)