शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

नदाल, मुगुरुजा उपउपांत्यपूर्व फेरीत

By admin | Updated: June 3, 2017 00:54 IST

नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने एकतर्फी लढतीत केवळ एक गेम गमावताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत

पॅरिस : नऊवेळा जेतेपदाचा मान मिळवणाऱ्या राफेल नदालने एकतर्फी लढतीत केवळ एक गेम गमावताना फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले तर गरबाईन मुगुरुजाने जेतेपद राखण्याच्या मोहिमेत आगेकूच केली. ोला गॅरोवर पुन्हा एकदा जेतेपदाचा दावेदार मानल्या जात असलेल्या नदालने जॉर्जियाच्या निकोलोज बासिलशविलीचा ६-०, ६-१, ६-० ने पराभव केला. नदालला पुढच्या फेरीत मायदेशातील सहकारी १७ व्या मानांकित रॉबर्टो बतिस्ता आगुतच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. आगुतने चेक प्रजासत्ताकच्या जिरी बेस्लीचा ६-३, ६-४, ६-३ ने पराभव केला. पाचव्या मानांकित कॅनडाच्या मिलोस राओनिक व आॅस्ट्रियाचा सहावा मानांकित डॉमिनिक थिएम अंतिम १६ खेळाडूंमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी ठरले. दुसऱ्या सेटमध्ये गुइलेमो गार्सिया लोपेजने जांघेच्या दुखापतीमुळे माघार घेतल्यामुळे राओनिकचा पुढच्या फेरीचा मार्ग प्रशस्त झाला. राओनिक ६-१, १-० ने आघाडीवर असताना स्पेनच्या लोपेजने लढतीतून माघार घेतली. राओनिकला पुढच्या फेरीत २० व्या मानांकित स्पेनच्या पाब्लो कारेनो बुस्ताच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. बुस्ताने ११ व्या मानांकित बुल्गारियाच्या ग्रीगोर दिमित्रोव्हचा ७-५, ६-३, ६-४ ने पराभव केला. थिएमने २५ व्या मानांकित अमेरिकेच्या स्टीव्ह जॉन्सनवर ६-१, ७-६, ६-३ ने सरशी साधली. महिला विभागात चौथ्या मानांकित मुगुरुजाने २७ व्या मानांकित कझाखस्तानच्या युलिया पुतिनस्तसेव्हाचा ७-५, ६-२ ने पराभव केला. १३ व्या मानांकित फ्रान्सच्या ख्रिस्टिना म्लादेनोव्हिचने अमेरिकेच्या शेल्बी रोजर्सची झुंज ७-५, ४-६, ८-६ ने मोडून काढली तर २३ व्या मानांकित आॅस्ट्रेलियाच्या सामंथा स्टोसुरने अमेरिकेच्या बेथानी माटेक सँड््सचा ६-२, ६-२ ने सहज पराभव केला. (वृत्तसंस्था)गतचॅम्पियन नोव्हाक जोकोव्हिचला शुक्रवारी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या तिसऱ्या फेरीत अर्जेंटिनाच्या डिएगो श्वार्ट्जमॅनविरुद्ध विजय मिळवताना निर्णायक सेटपर्यंत घाम गाळावा लागला. तिसऱ्या मानांकित जोकोव्हिचला सामन्यादरम्यान वर्तनासाठी ताकीदही देण्यात आली. सर्बियाच्या या खेळाडूने या लढतीत ५-७, ६-३, ३-६, ६-१, ६-१ ने सरशी साधली. जोकोव्हिचने सामन्यात ५५ टाळण्याजोग्या चुका केल्या. श्वाटर्््जमॅनला अखेर पाठदुखीचा फटका बसला. त्याने अखेरच्या १४ पैकी १२ गेम गमावले. जोकोव्हिचला उपउपांत्यपूर्व फेरीत १६ वे मानांकन प्राप्त फ्रान्सचा लुकास पाऊली व १९ वे मानांकन प्राप्त स्पेनचा अल्बर्ट रोमोस विनोलास यांच्यातील विजेत्या खेळाडूच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. पूरव-शरण जोडीउपउपांत्यपूर्व फेरीतभारताच्या पूरव राजा - दिविज शरण या पुरुष जोडीने फ्रेंच ओपन स्पर्धेच्या दुहेरी गटात विजयी कूच करताना आॅस्ट्रियाच्या आॅलिव्हर मराच आणि क्रोएशियाच्या मॅट पाविच या जोडीला नमवले. यासह पूरव - दिविज यांनी स्पर्धेच्या उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. त्याचवेळी, भारताचा दिग्गज लिएंडर पेसला मात्र दुहेरी गटातून गाशा गुंडाळावा लागला. स्पर्धेत बिगरमानांकीत असलेल्या भारताच्या पूरव - दिविज यांनी तीन सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या लढतीत झुंजार खेळाचे प्रदर्शन करताना आॅलिव्हर - मॅट यांचा ६-४, ३-६, ६-४ असा पाडाव केला. पहिला सेट सहजपणे जिंकून दमदार आघाडी घेतलेल्या भारतीयांना दुसऱ्या सेटमध्ये आॅलिव्हर - मॅट यांनी बाजी मारत सामना निर्णायक तिसऱ्या सेटमध्ये नेला. या निर्णायक सेटमध्ये मात्र भारतीयांनी जबरदस्त वर्चस्व राखताना आॅलिव्हर - मॅट यांना पुनरागमनाची संधी न देता बाजी मारली. भारतीय जोडीने ५ एस मारले. तसेच, ५ पैकी २ ब्रेक पॉइंट जिंकताना बाजी मारली. दुसरीकडे, भारताचा स्टार खेळाडू लिएंडर पेसला मात्र स्पर्धेबाहेरचा रस्ता पकडावा लागला. अमेरिकेचा स्कॉट लिप्सी याच्यासह खेळताना टॉमी रोबरेडो - डेव्हिड मारेरो या स्पेनच्या जोडीविरुध्द पराभूत व्हावे लागले. (वृत्तसंस्था)टॉमी - डेव्हिड यांनी मोक्याच्यावेळी खेळ उंचावताना पेस - स्कॉट यांना ७-६, ६-२ असा धक्का दिला.