शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
4
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
5
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
6
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
7
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
8
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
10
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
11
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
13
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
15
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
16
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
17
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
18
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
19
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
20
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद

उत्कृष्ट रँकिंगचे खेळाडू असावेत

By admin | Updated: September 24, 2015 23:43 IST

भारताला डेव्हिस चषकाच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर संघात उत्कृष्ट रँकिंग असलेल्या खेळाडूंनाच खेळविण्याची गरज असल्याचे मत माजी टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.

मुंबई : भारताला डेव्हिस चषकाच्या विश्व ग्रुपमध्ये स्थान मिळवायचे असेल, तर संघात उत्कृष्ट रँकिंग असलेल्या खेळाडूंनाच खेळविण्याची गरज असल्याचे मत माजी टेनिस दिग्गज विजय अमृतराज यांनी व्यक्त केले आहे.१०० अथवा ५०च्या बाहेर रँकिंग असलेल्या खेळाडूंसोबत डेव्हिस चषकाच्या ‘प्ले आॅफ’मधूनही भारताला बाहेर पडता येणार नाही, असे ६१ वर्षांचे अमृतराज यांना वाटते. भारताला विश्व प्ले आॅफमध्ये नुकताच चेक प्रजासत्ताकाकडून १-३ ने पराभवाचा सामना करावा लागला होता. पराभवानंतर भारतीय संघ पुन्हा आशिया ओशेनिया ग्रुप एकमध्ये परतला आहे. विशेष असे की, भारताकडे सध्या आघाडीच्या १०० जणांमध्ये असलेले रँकिंग खेळाडू नाहीतच. युकी भांबरीची क्रमवारी १२५, तर सोमदेव १६६ व्या स्थानावर आहे. अमृतराज पुढे म्हणाले, ‘सोमदेवने वेस्लीला पहिल्या दिवशी नमविले तेव्हा मी फार आनंदी होतो; पण दुसऱ्या दिवशी निराशा पदरी पडली. चेक संघ विश्व क्रमवारीत नंबर वन आहे, तर भारत २१ व्या स्थानावर येतो. अशावेळी विश्व ग्रुपमध्ये पोहोचणे स्वप्नवत होते. अशा कामगिरीसाठी १००च्या आत रँकिंग असलेल्या खेळाडूंची गरज असते.’आघाडीच्या १०० खेळाडूंमध्ये रँकिंग असेल, तरच टॉमस बेर्डीच किंवा मरे यांच्या सारख्या खेळाडूंना पराभूत करण्याचा विचार केला जाऊ शकतो. आमच्याकडे युकी किंवा सोमदेव यांच्यापेक्षाही सरस खेळाडू असावेत. त्यासाठी स्वित्झर्लंड किंवा स्पेनसारखा युवा अवस्थेत खेळाडूंचा शोध घ्यायला हवा. आठ- दहा वर्षांत एक खेळाडू मिळतो, हे भारतीय टेनिसला साजेसे नाही. दरम्यान, अमृतराज यांनी सानियाची प्रशंसा केली. सानिया ही चांगली कामगिरी करीत असून, मार्टिना हिंगीससोबत तिचा ताळमेळ चांगला असल्याचे सांगितले. (वृत्तसंस्था)