शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

MuscleBlaze ने उभरत्या अ‍ॅथलीट तेजस शिर्सेंना दिला हात; प्रेरणादायी डॉक्यूमेंटरीने ऑनलाइन प्रेक्षकांची मने जिंकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 18:56 IST

MuscleBlaze ब्रँडने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा युवा 110 मीटर हर्डलर तेजस शिर्से यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित डॉक्यूमेंटरी रिलीज केली असून, ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.

भारतातील अनेक टॅलेंटेड खेळाडू लहान शहरांमधून आणि साध्या कुटुंबांतून पुढे येतात; परंतु योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक पाठबळाच्या अभावामुळे त्यांची क्षमता अनेकदा दडपून राहते. अशा परिस्थितीत भारताचा अग्रगण्य स्पोर्ट्स न्यूट्रिशन ब्रँड MuscleBlaze ने खरोखरच धाडसी आणि अर्थपूर्ण पाऊल उचलले आहे.

ब्रँडने महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरचा युवा 110 मीटर हर्डलर तेजस शिर्से यांच्या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासावर आधारित डॉक्यूमेंटरी रिलीज केली असून, ती सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय ठरत आहे.

लहान शहरातून राष्ट्रीय विक्रमापर्यंत तेजसची अविश्वसनीय घोडदौडतेजस साध्या कुटुंबातील; घरात क्रीडा संस्कार नव्हते आणि परिसरात उत्तम सुविधा देखील नव्हत्या. शाळेतील एका शिक्षकांनी त्यांची धावण्यातील क्षमता ओळखली आणि त्यांची एथलेटिक्सची कारकीर्द सुरू झाली. मर्यादित संसाधन, मातीचा ट्रॅक, आर्थिक अडचणी या सगळ्यांशी झुंज देत तेजसने सराव चालू ठेवला. प्रशिक्षण खर्च भागवण्यासाठी त्यांनी ऑनलाइन शूज विकून स्वतःची मदत केली. 2018 मध्ये अंडर 17 नॅशनल स्कूल गेम्समध्ये त्यांनी पहिले सुवर्णपदक पटकावले आणि याच टप्प्यापासून त्यांचा प्रोफेशनल प्रवास वेगाने पुढे सरकला. JSW स्पोर्ट्स अकादमीमध्ये मिळालेल्या प्रो ट्रेनिंगने त्यांच्या खेळाला नवी धार मिळाली.

सुरुवातीच्या अपयशानंतर मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर स्वतःला मजबूत करून तेजसने 110 मीटर हर्डल्समध्ये 13.41 सेकंदांचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला जो आजही कायम आहे. 

MuscleBlaze चा ‘ग्राउंड-लेवल टॅलेंट सपोर्ट’ मॉडेल ठरत आहे गेम-चेंजरआज अनेक ब्रँड्स फक्त स्टार अ‍ॅथलीट्स वा सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर्ससोबत काम करण्यावर भर देतात. परंतु MuscleBlaze ने वेगळा मार्ग स्वीकारला आहे मोठ्या मार्केटिंग बजेटऐवजी भारतीय ग्रासरूट अ‍ॅथलीट्समध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे.

तेजसला दिलेल्या समर्थनातून ब्रँडने स्पष्ट संदेश दिला आहे:“खेळाडूंना मदत त्यांच्याकडे पदके येण्याआधी मिळायला हवी, त्यांच्या संघर्षाच्या काळात मिळायला हवी.” भारतामध्ये स्पोर्ट्स न्यूट्रिशन क्षेत्रात अशी वास्तविक व जमिनीवरची कामगिरी करणारे ब्रँड्स अत्यंत कमी आहेत. ही गोष्टच MuscleBlaze ला वेगळं स्थान देते.

लोकांचे भावनिक प्रतिसाद: प्रेरणादायी कथा देशभर पोहोचत आहेडॉक्यूमेंटरी रिलीज होताच सोशल मीडियावर सकारात्मक प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. अनेकांनी ही कथा ‘हृदयाला भिडणारी’, ‘उत्साह वाढवणारी’ आणि ‘भारताला हवी असलेली खरी स्पोर्ट्स स्टोरी’ असे वर्णन केले.

एका खेळाडूपासून संपूर्ण स्पोर्ट्स इकोसिस्टमपर्यंत MuscleBlaze चा परिणाम मोठाही भागीदारी फक्त एका खेळाडूला दिलेले सहकार्य नाही. हे उदाहरण दाखवते की योग्य ठिकाणी केलेले गुंतवणूक संपूर्ण खेळयंत्रणेला मजबूत करू शकते.तेजससारख्या कथा लहान शहरांतील हजारो युवकांना नवी स्वप्ने आणि नवा आत्मविश्वास देतात. या डॉक्यूमेंटरीद्वारे MuscleBlaze ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की भारताची खरी ताकद तिच्या ग्रासरूट लेव्हलवरील खेळाडूंमध्ये दडलेली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : MuscleBlaze Backs Athlete Tejas Shirse; Inspires with Documentary

Web Summary : MuscleBlaze supports Tejas Shirse, a young hurdler from Maharashtra, with a documentary showcasing his journey from humble beginnings to national record holder. This initiative highlights MuscleBlaze's commitment to investing in grassroots athletes and fostering a stronger sports ecosystem in India, inspiring many.