शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मरे तिसऱ्या फेरीत, किर्गियोसची आगेकूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2021 05:29 IST

नोवाक जोकोविचचा उमदेपणा...

लंडन : ॲन्डी मरे आणि निक किर्गियोस यांनी झुंजारवृत्तीचा परिचय देत दोन सेट गमावल्यानंतरही विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजय संपादन केला. ढोपरावर दोनदा शस्त्रक्रिया आणि त्यानंतर अनेकदा जखमांनी त्रस्त झालेल्या मरेने दुसऱ्या फेरीच्या लढतीत नवखा ऑस्कर ओटी याला ४-६, ४-६, ६-४, ६-२ ने पराभूत केले. सामन्यादरम्यान तो दोनदा कोर्टवर पडला. ऑस्ट्रेलियाच्या किर्गियोसने २१वा मानांकित युगो हम्बर्टचा ६-४, ४-६, ३-६, ६-१९-७ ने पराभव केला. रात्रीच्या संचारबंदीमुळे हा सामना बुधवारी (दि. ३०) पूर्ण होऊ शकला नव्हता. याशिवाय दोन दिवसांच्या पावसामुळे किमान सहा सामने तिसऱ्या दिवशी आटोपण्यात आले.

१९ वेळेचा ग्रॅन्डस्लॅम चॅम्पियन नोवाक जोकोविच हादेखील तिसऱ्या फेरीत दाखल झाला. त्याने केविन ॲन्डरसनवर ६-३, ६-३, ६-३ ने मात केली. तिसरी फेरी गाठणाऱ्या अन्य खेळाडूंमध्ये फ्रान्सिस टिफोऊ, सॅबेस्टियन कोर्डा, फॅबियो फोगनिनी, सलोनी स्टीफन्स   यांचा समावेश आहे. 

नोवाक जोकोविचचा उमदेपणा...

उदय बिनिवालेलंडन : विक्रमी ग्रॅण्डस्लॅमचा मानकरी सर्बियाचा नोवाक जोकोविचने बुधवारी विम्बल्डनचा दुसरा सामना जिंकला. यानंतर पत्रकार परिषदेत तो उपस्थित झाला. आयोजकांनी इंग्रजीत तीन किंवा चार प्रश्न विचारावेत, तसेच नंतर सर्बियन भाषेत प्रश्न विचारले जातील, अशी सूचना केली. 

नोवाकने मात्र मध्ये हस्तक्षेप करीत, ‘इंग्रजीत प्रश्न विचारणारे बरेच हात वर दिसत असून, ते नाराज जाणवतात, त्यांनाही प्रश्न विचारू द्या’, असे सांगितले. यामुळे इंग्रजीत आणखी प्रश्न विचारण्यात आले. यामुळे जोकोविचने मात्र उपस्थितांची मने जिंकली. दर्जेदार खेळासोबतच मनाचा प्रचंड मोठेपणा असलेला खेळाडू जोकोविचच्या रूपाने पाहायला मिळाला. महान नोवाकच्या खेळाडूवृत्तीला सलाम!

टेनिसयुद्ध अवर्णनीय : सबालेंकाn बेलारूसची दुसरी मानांकित आर्यना सबालेंका हिने अपेक्षेनुसार सेंटर कोर्टवर विजय साजरा केला. ती म्हणाली, ‘येथे पहिल्यांदा खेळतेवेळी प्रचंड दडपणाखाली आणि भावुक होते. n अनुभवाच्या बळावर खेळात विविधता आणून विजयावर शिक्कामोर्तब केले. हे अवर्णनीय असे टेनिसयुद्ध आहे. या संपूर्ण वातावरणाचा आम्ही पुरेपूर आनंद घेत आहोत.

टॅग्स :Tennisटेनिस