शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

मुंबईचा थरारक विजय...

By admin | Updated: May 15, 2015 15:28 IST

अखेरच्या षटकांत कोलकाताला विजयासाठी १२ धावांची गरज... कोलकाताच्या सा-या आशा होत्या त्या स्ट्राइकवर असणाऱ्या धडाकेबाज युसूफ पठाणवर.

रोहित नाईक, मुंबईअखेरच्या षटकांत कोलकाताला विजयासाठी १२ धावांची गरज... कोलकाताच्या सा-या आशा होत्या त्या स्ट्राइकवर असणाऱ्या धडाकेबाज युसूफ पठाणवर... त्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने चेंडू किएरॉन पोलार्डच्या हाती देऊन एकप्रकारे जुगारच खेळला. कारण, संपूर्ण सामन्यात किरॉन पोलार्डने एकही षटक टाकलेले नसताना शेवटचे निर्णायक षटक पोलार्ड टाकणार होता. यामुळे सर्वांचीच उत्सुकता ताणलेली होती. पोलार्डने देखील आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवताना या षटकात पठाणच्या विकेटसहीत केवळ ६ धावा देताना मुंबईला थरारकरीत्या ५ धावांनी विजय मिळवून दिला.अत्यंत चुरशीच्या व तणावपूर्ण झालेल्या या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने आपल्या कल्पक नेतृत्त्वाच्या जोरावर मुंबईच्या प्ले आॅफ गाठण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. मुंबईने दिलेले १७२ धावांचे आव्हान पार करताना कोलकाताची चांगल्या सुरुवातीनंतरही दमछाक झाली. कोलकाताला २० षटकांत केवळ ७ बाद १६६ धावा अशीच मजल मारता आली. कर्णधार गौतम गंभीर (३८) आणि युसूफ पठाण (५२) यांनी झुंजार फलंदाजी करताना कोलकाताच्या आशा जिवंत ठेवल्या होत्या. जगदीश सुचिथने गंभीरचा अडथळा दूर केल्यानंतर युसूफने आपल्या ‘पठाणी’ दणक्याच्या जोरावर मुंबईच्या तंबूत चिंतेचे वातावरण निर्माण केले होते. अखेरच्या २ षटकांत २१ धावांची गरज असताना हुकूमी लसिथ मलिंगाने केवळ ९ धावा देवून सामना रंगतदार केला. सुचिथचे २ तर हार्दिक पांड्याची ३ षटके बाकी असताना रोहितने चेंडू पोलार्डकडे सोपवून सर्वांनाच चकीत केले. कर्णधाराने खेळलेला हा जुगार पोलार्डने चांगलाच यशस्वी ठरवताना पहिल्याच चेंडूवर धोकादायक पठाणला बाद करून कोलकाताला जखडवून ठेवले.तत्पूर्वी कोलकाताने नाणेफेक जिंकून यजमानांना प्रथम फलंदाजी दिली. सलामीवर पार्थिव पटेल (२१) आणि लैंडेल सिमेन्स (१४) आणि अंबाती रायडू (२) स्वस्तात परतल्याने मुंबईची ३ बाद ४७ अशी अवस्था झाली. रोहित शर्माने किएरॉन पोलार्डसोबत मुंबईला सावरले. रोहित २१ चेंडूत ५ चौकारांसह ३० धावा काढून सुनील नरेनच्या अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत झाला. मुंबई ४ बाद ७९ अशा अडचणीत असताना हार्दिक पांड्याने कोलकाताला चोपण्यास सुरुवात केली. त्याने उमेश यादव टाकत असलेल्या १७व्या षटकात ४ खणखणीत चौकार खेचताना मुंबईच्या धावसंख्येला गती दिली. पोलार्ड-पांड्या यांनी पाचव्या विकेटसाठी निर्णायक ५१ चेंडूत ९२ धावांची निर्णायक भागीदारी करुन मुंबईला आव्हानात्मक मजल मारुन दिली. पांड्याने ३१ चेंडूमध्ये ८ चौकार व २ षटकार खेचताना नाबाद ६१ धावांचा तडाखा दिला. तर पोलार्डने ३८ चेंडूत एक चौकार व एक षटकारांसह संयमी ३३ धावांची खेळी खेळली. धावफलक:मुंबई इंडियन्स: लैंडल सिमेन्स झे. पांड्ये गो. मॉर्केल १४, पार्थिव पटेल झे. पांड्ये गो. हसन २१, रोहित शर्मा त्रि. गो. नरेन ३०, अंबाती रायडू झे. रसेल गो. हसन २, किरॉन पोलार्ड नाबाद ३३, हार्दिक पांड्या नाबाद ६१. अवांतर - १०. एकूण: २० षटकांत ४ बाद १७१ धावा. गोलंदाजी: उमेश यादव ३-०-३७-०; मॉर्नी मॉर्केल ४-०-२७-१; शाकिब हसन ४-०-२२-२; पीयूष चावला १-०-९-०; सुनील नरेन ४-०-३८-१; आंद्रे रसेल ४-०-३७-०.कोलकाता नाइट रायडर्स : रॉबिन उथप्पा झे. मलिंगा गो. हरभजन सिंग २५, गौतम गंभीर त्रि. गो. सुचिथ ३८, मनिष पांड्ये धावबाद (सिमेन्स) १, युसूफ पठाण झे. पटेल गो. पोलार्ड ५२, शाकिब अल हसन झे. पांड्या गो. विनयकुमार २३, आंद्रे रसेल झे. पटेल गो. मलिंगा २, सूर्यकुमार यादव झे. रायडू गो. मॅक्क्लेनघन ११, पीयूष चावला नाबाद १, उमेश यादव नाबाद ५. अवांतर - ८. एकूण: २० षटकांत ७ बाद १६६ धावा. गोलंदाजी : लसिथ मलिंगा ४-०-३१-१; मिचेल मॅक्क्लेनघन ४-०-३१-१; विनयकुमार ४-०-३३-१; हरभजन सिंग ४-०-३१-१; जगदीश सुचिथ २-०-२३-१; हार्दिक पाड्या १-०-१०-०; किरॉन पोलार्ड १-०-६-१.