शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
3
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
5
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
6
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
7
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
8
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
9
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
10
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
11
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
12
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
13
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
14
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
15
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
16
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
17
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
18
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
19
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
20
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
Daily Top 2Weekly Top 5

चिन्नास्वामीवर मुंबईचं ‘स्वामि’त्व

By admin | Updated: May 12, 2016 02:54 IST

गोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे फलंदाजांनी चीज केल्यामुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेट आणि ८ चेंडू राखून पराभूत केले.

विश्वास चरणकर, बंगळुरूगोलंदाजांनी घेतलेल्या श्रमाचे फलंदाजांनी चीज केल्यामुळे मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला ६ विकेट आणि ८ चेंडू राखून पराभूत केले. आरसीबीने दिलेले १५२ धावांचे आव्हान मुंबईने ४ गड्यांच्या मोबदल्यात १८.४ षटकांत पूर्ण केले. या पराभवामुळे आरसीबीचा प्लेआॅफचा मार्ग खडतर बनला आहे. त्यांना आता पुढील चारीही सामने जिंकावे लागणार आहेत. विजयी मुंबई गुणतालिकेत चौथ्या स्थानावर आली आहे. चार षटकांत १५ धावा देऊन डिव्हीलियर्सचा महत्त्वपूर्ण बळी घेणारा कृणाल पांड्या सामनावीरचा मानकरी ठरला.चिन्नास्वामी स्टेडियमवर मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात बुधवारी आरसीबीने दिलेल्या १५२ धावांचा पाठलाग करताना मुंबईची सलामी नेहमीप्रमाणे अपयशी ठरली. दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर अरविंदने पार्थिवला बाद करून मुंबईला झटका दिला. केवळ एक धाव करणारा पार्थिव स्लिपमध्ये शेन वॉटसनकडे झेल देऊन परतला. परंतु या झटक्याचा फारसा परिणाम होऊ न देता रोहित शर्मा आणि अम्बाती रायडू यांनी वाटचाल सुरू ठेवली. दोघांनी सावध खेळी करताना ४१ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. ही बहरत चाललेली भागीदारी वरुण अ‍ॅरॉनने संपुष्टात आणली. रोहित त्याचा आवडता पूलचा फटका मारताना चुकला आणि ए. बी. डिव्हीलियर्सच्या हातात सोपा झेल दिला. रोहितने २४ चेंडूंत ३ चौकारांसह २५ धावा केल्या. दहा षटकांनंतर मुंबईच्या २ बाद ६० धावा झाल्या होत्या. योगायोगाने आरसीबीच्याही इतक्याच धावा होत्या. हार्दिक पांड्याच्या जागी संधी मिळालेल्या नितीश राणा (९) चमक दाखवू शकला नाही, यजुवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर स्टुअर्ट बिन्नीने एका उत्कृष्ट झेलद्वारे त्याला तंबूत धाडले. मुंबईचा धावफलक ३ बाद ७९ असा झाल्यामुळे मुंबईच्या गोटात चिंता पसरली होती. एका बाजूने सेट झालेल्या रायडूला वरुण अ‍ॅरॉनने बाद करून मुंबईचा ठोका वाढविला. रायडूने ४४ धावा केल्या. यानंतर पोलार्ड आणि जोस बटलर या जोडीने कोणतीही पडझड होऊ न देता विजयासाठी आवश्यक धावगती ‘मेंटेन’ केल्याने मुंबईचा विजय साकार झाला. पोलार्ड ३५ धावा (१९ चेंडू, ३ चौकार, २ षटकार)आणि बटलर २९ धावांवर (११ चेंडू १ चौैकार, ३ षटकार) नाबाद राहिले. आरसीबीच्या वरुण अ‍ॅरॉनने ३७ धावांत २ बळी घेतले.तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून रोहित शर्माने यजमान आरसीबीला फलंदाजीस पाचारण केले. कर्णधार विराट कोहली आणि ख्रिस गेल यांनी डावाची सुरुवात केली. मुंबईच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत विराट (७), गेल (५), ए. बी. डिव्हीलियर्स (२४) आणि शेन वॉटसन (१५) हे दिग्गज फलंदाज अपयशी ठरूनही के. एल राहुलचे झुंजार अर्धशतक आणि त्याने सचिन बेबीसोबत शेवटी केलेल्या २७ चेंडूंत ५३ धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने २० षटकांत ४ बाद १५१ अशी सन्मानजनक धावसंख्या उभारली. राहुलने ५३ चेंडूंत ६८ धावांची नाबाद खेळी केली. त्याला ऐन मोक्याच्या क्षणी मोलाची साथ देणारा सचिन बेबी २५ धावांवर नाबाद राहिला. लोकल बॉय के. एल राहुलने ४२ चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. यात त्याचे ३ चौकार आणि २ षटकार होते. सामन्यावर मुंबईने पूर्णपणे पकड मिळवली असताना १८ वे षटक किरॉन पोलार्डला देण्याचा रोहित शर्माचा निर्णय महागडा ठरला. या षटकात तब्बल २२ धावा गेल्या. पोलार्डला राहुलने एक षटकार, तर सचिन बेबीने दोन षटकार आणि एक चौकार ठोकला. या षटकामुळे आरसीबीला दीडशेचा टप्पा गाठता आला. राहुल ६८ (५३ चेंडू, ३ चौकार, ४ षटकार) आणि सचिन बेबी २५ (१३ चेंडू, २ चौकार, २ षटकार) हे दोघे नाबाद राहिले. मुंबईकडून कृणाल पांड्याने १५ धावांत १ बळी घेतला.>संक्षिप्त धावफलकरॉयल चॅलेंजर्स बँगलोर : विराट कोहली ७, ख्रिस गेल ५, ए. बी. डिव्हीलियर्स २४, के. एल. राहुल नाबाद ६८, शेन वॉटसन १५, सचिन बेबी नाबाद २५. अवांतर ७. एकूण २० षटकांत ४ बाद १५१ धावा. गोलंदाजी : साउदी ४-०-२७-१, मॅक्लेनघन ४-०-३५-१, कृणाल पांड्या ४-०-१५-१. मुंबई इंडियन्स : पार्थिव पटेल १, रोहित शर्मा २५, अम्बाती रायडू ४४, नितीश राणा ९, किरॉन पोलार्ड नाबाद ३५, जोस बटलर नाबाद २९. एकूण : १८.४ षटकांत ४ बाद १५३ धावा. अवांतर : १०. गोलंदाजी : एस. अरविंद ४-०-२३-१, चहल ४-०-१६-१, अ‍ॅरॉन ३.४-०-३७-२.