शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

देवेंद्रसमोर मुंबईचे ‘नमन’!

By admin | Updated: January 8, 2015 01:20 IST

रणजी करंडक स्पर्धेच्या पाचव्या लढतीत ४०४ धावांचा डोंगर उभा करूनही यजमान मुंबईला मध्य प्रदेशसमोर ‘नमन’ व्हावे लागले.

रणजी करंडक : मध्ये प्रदेशची १३४ धावांची आघाडीमुंबई : रणजी करंडक स्पर्धेच्या पाचव्या लढतीत ४०४ धावांचा डोंगर उभा करूनही यजमान मुंबईला मध्य प्रदेशसमोर ‘नमन’ व्हावे लागले. कर्णधार देवेंद्र बुंदेला आणि यष्टीरक्षक नमन ओझा यांच्या प्रत्येकी शतकी खेळीच्या बळावर मध्य प्रदेशने तिसऱ्या दिवसअखेर ७ बाद ५३८ धावांची मजल मारली. या दोघांच्या शतकांमुळे पाहुण्यांनी १३४ धावांची आघाडी घेतली आहे.३ बाद २२१ धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या मध्य प्रदेशसाठी बुंदेला आणि ओझा धावून आले. दुसऱ्या दिवसअखेर बुंदेला ४२ तर ओझा ६० धावांवर खेळत होते. या धावांवरून तिसऱ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या या दोघांनी मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी २५८ धावांची विक्रमी भागीदारी केली. आगामी तिरंगी मालिकेसाठी भारतीय संघात राखीव यष्टिरक्षक म्हणून निवड झालेल्या ओझाने १९ चौकार आणि एक षटकार खेचून १५५ धावा, तर बुंदेलाने १४ चौकार व १ षटकार खेचून ११५ धावा चोपल्या. मुंबईच्या आक्रमणासमोर या जोडीने तब्बल ४७८ चेंडूंचा सामना करून २५८ धावांची भागीदारी केली. त्यांच्या या भागीदारीमुळे मध्य प्रदेशने मुंबईने पहिल्या डावात केलेल्या ४०४ धावांचा पल्ला सहज पार केला. ओझाने आपले १८ वे प्रथम श्रेणीतील शतक पूर्ण केले. ७९ षटकांची ही भागीदारी जावेद खान याने ओझाला बाद करून तोडली. त्यापाठोपाठ बुंदेलाही संघाचा चारशेचा आकडा पार करून माघारी परतला. त्याला इकबाल अब्दुल्लाने बाद केले. ही जोडी माघारी परतल्यानंतर मध्य प्रदेशवर दडपण निर्माण होईल असे वाटले होते, परंतु हरप्रीत सिंग भाटीयाच्या वादळी खेळीने मुंबईला हतबल केले. हरप्रीतने ८७ चेंडूत १० चौकार व १ षटकार खेचून ६७ धावांची ताबडतोड खेळी केली. तिसऱ्या दिवसअखेर मध्य प्रदेशने १६२ षटकांत ७ बाद ५३८ धावांची मजल मारली होती. अंकित शर्मा (३५) आणि पुनीत दाते (१६) हे खेळत आहेत. (क्रीडा प्रतिनिधी)गेल्या दोन सामन्यांत प्रत्येकी पाच विकेट्स घेणाऱ्या शार्दूल ठाकूरची लय वानखेडे स्टेडियमवर हरवली आहे. आतापर्यंत यंदाच्या हंगामात मुंबईकडून सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या शार्दूलला ३२ षटकांत एकही विकेट घेता आलेली नाही. त्यात त्याने केवळ ७ निर्धाव षटके टाकली आणि ३.५६च्या सरासरीने ११४ धावा दिल्या.संक्षिप्त धावफलकमुंबई : सर्वबाद ४०४ धावामध्य प्रदेश : संजय मिश्रा धावबाद (जावेद) १०, जलाज सक्सेना झे. खान व अब्दुल्ला ८५, रमीज खान झे. तरे गो. मोटा १८, नमन ओझा झे. यादव गो. जावेद १५५, देवेंद्र बुंदेला झे. मोटा गो. अब्दुल्ला ११५, हरप्रीत सिंग झे. मोटा गो. लाड ६७, शुभम शर्मा झे. यादव गो. अब्दुल्ला १५, अंकित शर्मा नाबाद ३५, पुनीत दाते नाबाद १६. अवांतर - २२ ; एकूण - १६२ षटकांत ७ बाद ५३८ धावागोलंदाजी - शार्दूल ठाकूर ३२-७-११४-०, विल्कीन मोटा २९-७-८८-१, जावेद खान २९-८-७८-१, क्षेमल वायंगणकर १८-२-४६-०, इकबाल अब्दुल्ला ४०-६-१२३-३, अखिल हेरवाडकर ६-०-२७-०, सूर्यकुमार यादव ३-०-२२-०, सिद्धेश लाड ५-०-२४-१.258 धावांची भागीदारी बुंदेला आणि ओझा यांनी चौथ्या विकेटसाठी करून मध्य प्रदेशला आघाडी मिळवून दिली. या जोडीने ७९.१ षटके खेळपट्टीवर तग धरत ३.२५च्या सरासरीने धावा केल्या.155 धावांची खेळी करणाऱ्या नमन ओझाने प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १८ वे शतक मुंबईविरुद्ध ठोकले. या खेळीत त्याने ३५८ मिनिटे खेळपट्टीवर तग धरून २६९ चेंडूंत १४ चौकार व १ षटकार खेचत मुंबईच्या गोलंदाजांची हवा काढली.