शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

मुंबईची पकड घट्ट !

By admin | Updated: January 31, 2015 04:55 IST

यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान

बडोदा : यंदाच्या रणजी मोसमात तब्बल ६ सामन्यांनंतर अखेर बडोदाविरुद्ध मुंबईचा बहारदार खेळ पाहायला मिळाला. पहिल्या डावात यजमान बडोदाने २८७ धावांमध्ये रोखल्यानंतर मुंबईने बलविंदर संधू (४/३५) आणि हरमीत सिंग (४/५२) यांच्या अचूक माऱ्याच्या जोरावर यजमानांना १८४ धावांत गुंडाळून तब्बल १०३ धावांची मजबूत आघाडी घेतली. याआधी नवनिर्वाचित कर्णधार आदित्य तरे (२६६ चेंडूंत १२७ धावा) याने फटकावलेल्या संयमी नाबाद शतकाच्या जोरावर मुंबईला अडीचशेचा टप्पा ओलांडता आला.मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना सलामीवीर केदार देवधर (२३) आणि कर्णधार आदित्य वाघमोडे (०) लागोपाठ बाद झाल्याने बडोदाची अवस्था बिनबाद ४७वरून २ बाद ४७ अशी झाली. यानंतर फलकावर ५२ धावा लागलेल्या असताना सौरभ वाकसकर (२२)देखील माघारी परतल्याने यजमान अडचणीत आले. विशेष म्हणजे हे तिन्ही फलंदाज संधूने बाद केल्याने त्याने आपली निवड सार्थ ठरवली. यानंतर मुंबईचा हुकमी एक्का शार्दुल ठाकूरने युसुफ पठाणला माघारी धाडत बडोदाची ४ बाद ६१ अशी कोंडी केली.या वेळी मुंबई पकड घट्ट करणार असे दिसत असतानाच हार्दिक पंड्या (५३) आणि दीपक हुडा (३१) यांनी पाचव्या विकेटसाठी ६६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. मात्र पुन्हा एकदा संधूने मुंबईला यश मिळवून देताना हुडाचा अडसर दूर केला. तर यजमानांचे शेपूट फार वेळ तग धरणार नाही याची योग्य खबरदारी घेताना हरमीत सिंगने इरफान पठाण (११), पिनल शहा (०), स्वप्निल सिंग (१६) आणि भार्गव भट्ट (६) यांना तंबूचा रस्ता दाखवत मुंबईला निर्णायक आघाडी मिळवून दिली. यजमानांकडून हार्दिक पंड्याने एकाकी लढत देताना सर्वाधिक ५३ धावा काढल्या. तत्पूर्वी कालच्या ६ बाद २१८ या धावसंख्येवरून सुरुवात करताना मुंबईला सुरुवातीलाच धक्का बसला. शार्दुल ठाकूरला भोपळा फोडण्यात अपयश आल्याने याच धावसंख्येवर मुंबईची सातवी विकेट पडली. त्याचवेळी एका बाजूने फलंदाज केवळ हजेरी लावून जात असताना कर्णधार तरे मात्र तळ ठोकून उभा होता. तरेने मोक्याच्या वेळी फटकेबाजी करताना मुंबईची धावसंख्या २८७ धावांवर नेली. तरेने १४ चौकार व १ उत्तुंग षटकार खेचताना शतक झळकावले. तर यजमानांकडून पठाण बंधूंनी प्रत्येकी ३ तर मुनाफ पटेलने २ गडी बाद करताना मुंबईची धावसंख्या मर्यादित राखली. (क्रीडा प्रतिनिधी)