शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
3
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
4
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
5
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
6
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
7
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
8
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
9
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
10
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
11
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
12
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
13
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
14
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
15
दुधाचे भाव कमी होणार! अमूल-मदर डेअरीचे दूध किती रुपयांनी स्वस्त होणार? कंपनीकडून निर्णयाचं स्वागत
16
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?
17
भुजबळ म्हणाले, "हैदराबाद गॅझेटचा जीआर रद्द करा", विखे पाटलांनी दिलं उत्तर, म्हणाले "रद्द करण्याची गरज नाही"
18
वीज बिलाची चिंता सोडा, पिकांना भरपूर पाणी द्या; उपसा योजनांच्या वीज सवलतीस २ वर्षे मुदतवाढ
19
बाप बडा न भैया, सबसे बडा रुपैया! जमिनीच्या वाटणीसाठी मृतदेह २ दिवस ठेवला घरात
20
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न

मुंबई विद्यापीठ चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन; नागपूर विद्यापीठाचा केला पराभव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 18:56 IST

मुंबई, भारती, एसएनडीटी आणि नागपूर विद्यापीठ संघ राष्ट्रीय पातळीवर खेळणार

ठळक मुद्देअमरावती विद्यापीठात महिला कबड्डी स्पर्धा  मुंबई, भारती, एसएनडीटी आणि नागपूर विद्यापीठ संघ राष्ट्रीय पातळीवर खेळणार

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर ५ ते ९ डिसेंबर दरम्यान झालेल्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी झालेल्या साखळी सामन्यांमध्ये मुंबई विद्यापीठाने अव्वल क्रमांकासह ‘चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन’चा बहुमान पटकावला. द्वितीय स्थानी भारती विद्यापीठ पुणे, तृतीय स्थानी एसएनडीटी (मुंबई), तर चौथे स्थान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने पटकाविले. याप्रसंगी सर्व चमू आणि प्रशिक्षकांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.  

समारोपीय सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून व्यवस्थापन परिषद सदस्य वसंत घुईखेडकर, प्रदीप खेडकर, प्रफुल्ल गवई, शारीरिक शिक्षण व रंजन मंडळाचे सदस्य सुनील डंबारे, पंच समितीचे अध्यक्ष सतीश डफळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक अविनाश असनारे उपस्थित होते. पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत अव्वल चार संघ मुंबई विद्यापीठ, भारती विद्यापीठ, एसएनडीटी विद्यापीठ आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ हे अखिल भारतीय स्तरावर पश्चिम विभागाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ते दमदार कामगिरी करतील आणि विभागाचा नावलौकिक वाढवतील, असा आशावाद पाहुण्यांनी व्यक्त केला तसेच सर्व चमूंतील खेळाडू, प्रशिक्षक व क्रीडा संचालकांचे कौतुक केले. संचालन  विजय पांडे व आभार प्रदर्शन अविनाश असनारे यांनी केले.

वाराणसी येथे होणार राष्ट्रीय कबड्डी स्पर्धाअखिल भारतीय महिला कबड्डी स्पर्धा पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये बनारस हिंदू विद्यापीठ (वाराणसी) येथे होत आहे. दरम्यान, पाच दिवस चाललेल्या पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेत विद्यापीठाच्या यजमानपदाखाली ६१ संघ, ७२० खेळाडू व १२० संघ प्रशिक्षकांनी उपस्थिती दर्शविली. चार मैदानांची निर्मिती व विविध समित्यांचे गठण केले. संलग्नित महाविद्यालयांतील १५० शारीरिक शिक्षण संचालकांचा सहभाग, अमूल्य योगदान, सहकार्य, विदर्भ कबड्डी फेडरेशन समितीच्या पंचांचे उत्कृष्ट सहकार्य लाभले, असे अविनाश असनारे म्हणाले. 

असे रंगले सामने      सोमवारी चुरशीच्या सामन्यात मुंबई विद्यापीठ संघाने नागपूर विद्यापीठाचा ३० विरुद्ध १९ असा ११ गुणांनी पराभव करीत अजिंक्यपद पटकाविले. मुंबई विद्यापीठातर्फे मेघा, समरीन, साक्षी आणि नसरीन यांनी उत्कृष्ट चढाई केली. दुसºया अटीतटीच्या सामन्यात भारती विद्यापीठ संघाने एसएनडीटी संघाचा २२ विरुद्ध १९ असा अवघ्या तीन गुणांनी निसटता पराभव करीत स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. संघातर्फे काजल जाधव, आदिती जाधव आणि पूनम तांबे यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. 

टॅग्स :Kabaddiकबड्डीMumbaiमुंबईAmravatiअमरावती