शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

मुंबईची रेल्वेला धडक

By admin | Updated: November 19, 2015 01:01 IST

सामन्यावर पुर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेने बलाढ्य मुंबई विरुध्द घेतलेला निर्णय अखेर त्यांना महागात पडला. दुसऱ्या डावात ४ बाद ४०८ धावा काढून डाव घोषित

मुंबई : सामन्यावर पुर्ण नियंत्रण मिळवल्यानंतर रेल्वेने बलाढ्य मुंबई विरुध्द घेतलेला निर्णय अखेर त्यांना महागात पडला. दुसऱ्या डावात ४ बाद ४०८ धावा काढून डाव घोषित केलेल्या रेल्वेने यजमानांना विजयासाठी चौथ्या दिवशी २९५ धावांचे आव्हान दिले. मात्र खडूस वृत्तीसाठी प्रसिध्द असलेल्या मुंबईने आपल्या लौकिकानुसार खेळ करताना अखिल हेरवाडकर, श्रेयश अय्यर आणि कर्णधार आदित्य तरे यांच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर रेल्वेला ६ विकेट्सने नमवले.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात विजय मिळवताना मुंबईने रणजी ट्रॉफीच्या ‘ब’ गटात ६ सामन्यांतून ३ विजय व ३ अनिर्णित अशा कामगिरीसह २६ गुणांची कमाई करत अग्रस्थान कायम राखले. त्याचवेळी रेल्वे संघाचा ७ सामन्यांतील हा सहावा पराभव ठरला. रेल्वे ६ गुणांसह ‘ब’ गटात तळाला आहे. या धमाकेदार विजयासह मुंबईने बाद फेरी गाठण्याच्या दिशेने दमदार आगेकूच केली आहे. सौरभ वाकसकर आणि व्ही. चेलुवराज यांच्या शानदार शतकाच्या जोरावर रेल्वेने चौथ्या दिवशी १ बाद २८५ धावांवरुन सुरुवात करताना दुसरा डाव ४ बाद ४०८ धावांवर घोषित करुन धाडसी निर्णय घेतला. विशाल दाभोळकरने मुंबईकडून यशस्वी मारा करताना ११५ धावांत ३ बळी घेतले. पहिल्या डावात ७ बळी घेऊन मुंबईला धक्के देणाऱ्या कर्ण शर्माच्या फिरकीवर रेल्वेच्या आशा होत्या. कर्णला दुसऱ्या डावात २६ षटकांत ११० धावांच्या मोबदल्यात केवळ एक बळी घेण्यात यश आले. (क्रीडा प्रतिनिधी)धावफलकरेल्वे (पहिला डाव) : सर्वबाद २१७ धावा.मुंबई (पहिला डाव) : सर्वबाद ३३१ धावा.रेल्वे (दुसरा डाव) : सौरभ वाकसकर झे. अय्यर गो. दाभोळकर १८५, आशिष सिंग पायचीत गो. दाभोळकर ४४, व्ही. चेलुवराज नाबाद १३३, अक्षत पांड्ये झे. तरे गो. दाभोळकर ९, विवेक सिंग झे. यादव गो. लाड २६. अवांतर - ११. एकूण : १०४ षटकांत ४ बाद ४०८ धावा घोषित.गोलंदाजी : धवल कुलकर्णी २२-७-६१-०; शार्दुल ठाकूर १९-५-७१-०; विशाल दाभोळकर २३-१-११५-३; जय बिस्त १९-२-७२-०; हरमीत सिंग १२-०-४०-०; सिध्देश लाड ५-०-२८-१; श्रेयश अय्यर ४-१-११-०.मुंबई (दुसरा डाव) : अखिल हेरवाडकर झे. व गो. मिश्रा ७५, जय बिस्त झे. रावत गो. अनुरीत सिंग १०, श्रेयश अय्यर झे. विवेक सिंग गो. शर्मा ९१, सुर्यकुमार यादव झे. व गो. मिश्रा ३, आदित्य तरे नाबाद ७१, सिध्देश लाड नाबाद ४१. अवांतर - ४. एकूण : ६४ षटकांत ४ बाद २९५ धावा.गोलंदाजी : अनुरीत सिंग ७-०-२९-१; अक्षत पांड्ये ३-०-२७-०; अर्णब नंदी १६-०-७२-०; कर्ण शर्मा २६-१-११०-१; सागर मिश्रा १२-०-५३-२.