शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

विजयी चौकारासह मुंबई अव्वलस्थानी

By admin | Updated: April 16, 2017 19:55 IST

आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई इंडियन्सने आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. नितीश राणा आणि कायरन पोलार्डने केलेल्या

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 16 - आयपीएलच्या चौथ्या हंगामात मुंबई  इंडियन्सने  आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. नितीश राणा आणि कायरन पोलार्डने केलेल्या घणाघाताच्या जोरावर मुंबईने गुजरात लायन्सवर सहा गडी राखून मात करत यंदाच्या हंगामातील सलग चौथ्या विजयाची नोंद केली. सोबतच पाच सामन्यातील चार विजय आणि 8 गुणांसह मुंबईने गुणतालिकेत अव्वलस्थान पटकावले आहे. 
गुजरातने दिलेल्या 177 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पार्थिव पटेल पहिल्याच षटकात बाद झाला. पण फॉर्ममध्ये असलेल्या नितीश राणाने (53) जोस बटलरच्या (26) साथीने 85 धावांची भागीदारी करत मुंबईच्या विजयाची पायाभरणी केली.  पण राणा आणि बटलर पाठोपाठ बाद झाल्याने सामन्यात रंगत आली. 
त्यानंतर कायरन पोलार्डने फटकेबाजी करून मुंबईला विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचवले. अखेर पोलार्ड 39 धावा काढून झाला. पण रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्याने गुजरातला चमत्काराची कोणतीही संधी न देता मुंबईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. 
 तत्पूर्वी मुंबईने नाणेफेक  जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारल्यावर पहिल्याच षटकात मॅकक्लेनाघनने ड्वेन स्मिथची विकेट काढत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. स्मिथला भोपळाही फोडता आला नाही. त्यानंतर ब्रॅंडन मॅक्युलम (64) आणि कर्णधार सुरेश रैना (28) यांनी दुसऱ्या गड्यासाठी 80 धावांची भागीदारी करत गुजरातला सावरले. 
पण रैना आणि मॅक्युलम ठराविक अंतराने बाद झाल्याने गुजरातचा डाव पुन्हा अडचणीत आला. मात्र 26 चेंडूत48 धावा कुटणाऱ्या दिनेश कार्तिंकने गुजरातला 20 षटकात 4 बाद 176 धावांपर्यंत मजल मारून दिली.  मुंबईकडून मॅकक्लेनाघनने दोन तर हरभजन आणि मलिंगाने प्रत्येकी एक बळी टिपला.