शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

ग्लॅमरस बॉडीबिल्डिंगसाठी मुंबई सज्ज

By admin | Updated: November 18, 2015 01:59 IST

शरीरसौष्ठवप्रेमींसाठी आगामी डिसेंबर महिना पर्वणीचा ठरणार आहे. १६ आणि १७ डिसेंबरला मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या तळवलकर्स क्लासिक या ग्लॅमरस बॉडीबिल्डिंग स्पर्धेचा थरार रंगणार

मुंबई : शरीरसौष्ठवप्रेमींसाठी आगामी डिसेंबर महिना पर्वणीचा ठरणार आहे. १६ आणि १७ डिसेंबरला मुंबईमध्ये प्रतिष्ठेच्या तळवलकर्स क्लासिक या ग्लॅमरस बॉडीबिल्डिंग स्पर्धेचा थरार रंगणार आहे. निवडक ३० खेळाडूंना निमंत्रित केलेल्या या स्पर्धेत देशभरातील अव्वल शरीरसौष्ठवपटू आपल्या पीळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करतील. विशेष म्हणजे या स्पर्धेद्वारे प्रथमच पुरुष व महिला खेळाडूंच्या मिश्र जोडीची स्पर्धाही रंगेल. त्यामुळेच यंदा स्पर्धेची उत्सुकता वाढली आहे.तब्बल १६.२५ लाखांची एकूण बक्षीस रक्कम असलेल्या या स्पर्धा खुल्या गटात रंगणार असून, विजेत्या शरीरसौष्ठवपटूला रोख ५ लाख रुपयांची घसघसीत विजयी रक्कम मिळणार आहे. तसेच अंतिम फेरीसाठी अव्वल १० शरीरसौष्ठवपटूंची निवड करण्यात येणार असून, प्रत्येक क्रमांकावरील खेळाडूला रोख रक्कम जिंकण्याची संधी असेल. त्याचप्रमाणे सर्वांचे लक्ष वेधलेल्या मिश्र जोडीच्या लढतीसाठी ६ जोड्यांनी सहभाग निश्चित केला असून, विजयी जोडीला रोख १ लाख रुपये जिंकण्याची संधी असेल.इंडियन बॉडीबिल्डर्स फेडरेशनच्या मान्यतेने माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत गतविजेता मुरली कुमार, मिस्टर आशिया सुनीत जाधव, जगदीश लाड, विपीन पीटर, बॉबी सिंग आणि बी. महेश्वरन यांसारखे बलाढ्य व कसलेले शरीरसौष्ठवपटू विजेतेपदासाठी आपले कसब पणास लावतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्रासह ओडिसा, दिल्ली, तामिळनाडू, हरियाणा आणि उत्तर प्रदेश येथील बलाढ्य शरीरसौष्ठवपटूंचाही स्पर्धेत सहभाग असल्याने स्पर्धेत मोठी चुरस रंगेल.