शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई - पुणे सायकल शर्यतीचा थरार २५ मार्चला रंगणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2018 20:42 IST

भारतामध्ये प्रतिष्ठेची व अत्यंत खडतर समजल्या जाणा-या या राष्ट्रीय स्तरावरील शर्यतीचे हे ५२ वे वर्ष आहे.

ठळक मुद्देही शर्यत गेल्यावर्षापासून दोन टप्प्यात होत असून पहिला टप्पा मुंबई ते खंडाळा हा आहे तर दुसरा टप्पा खंडाळा ते पुणे असा असेल.

मुंबई : सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र आणि क्रीडा जागृती यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २५ मार्च २०१८ रोजी मुंबई - पुणे सायकल शर्यतीचा थरार पहायला मिळणार आहे. 

भारतामध्ये प्रतिष्ठेची व अत्यंत खडतर समजल्या जाणा-या या राष्ट्रीय स्तरावरील शर्यतीचे हे ५२ वे वर्ष असून क्रीडा जागृती व सायकलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र सायकल जगतातील अव्वल नाव असलेल्या जायंट व स्टारकेन च्या सहकार्याने या शर्यतिचे आयोजन करत आहे. 

या वर्षात राष्ट्रीय एम टी बी व ट्रॅक सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले होते, तर राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेत पदतालिकेत महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर राहिला. 

विजेत्या व सहभागी सायकलपट्टूंना यावर्षी एकूण सहा लाख पंचवीस हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार असून एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम देणारी ही देशातील एकमेव सायकल शर्यत आहे. भारतीय सायकलिंग महासंघाकडे नोंदणी असलेल्या महाराष्ट्राबाहेरील प्रत्येक सायकलपटूस या शर्यतिमधील सहभागासाठी प्रत्येकी रुपये १,००० देण्यात येणार आहेत. ही शर्यत गेल्यावर्षापासून दोन टप्प्यात होत असून पहिला टप्पा मुंबई ते खंडाळा हा आहे तर दुसरा टप्पा खंडाळा ते पुणे असा असेल. दोनही टप्प्याची वेळ एकत्रित करुन या शर्यतिचा विजेता घोषित करण्यात येईल. शर्यत जलद होण्यासाठी विविध टप्यावर रोख बक्षिसे देण्यात येणार आहेत. पनवेल, खोपोली या टप्प्यावर येणा-या पहिल्या तीन सायकलपटूंना रोख पुरस्कार देण्यात  येणार आहेत. खडतर असा बोर घाट प्रथम पार करणा-या खेळाडूला घाटांचा राजा या किताबाने सन्मानित करण्यात येणार आहे.