शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई महापौर राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा : महिंद्रा व महात्मा गांधी संघांना जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 21:00 IST

महिंद्राचा आनंद शिंदे पुरुषांत,तर शिवशक्ती संघाची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.

ठळक मुद्दे11-10 असा खेळ जवळपास काही मिनिटे सुरू होता. यानंतर महिंद्राने अजिंक्य पवारला खेविण्याची चाल खेळली.

मुंबई : मुंबई महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत महिंद्रा संघाने पुरुषांत, तर महात्मा गांधी संघाने महिलांत विजेतेपद मिळविले. महिंद्राचा आनंद शिंदे पुरुषांत,तर शिवशक्ती संघाची रेखा सावंत महिलांत स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरले.मध्यांतराला महाराष्ट्र पोलीस संघाकडे ११-१०अशी आघाडी होती. 11-10 असा खेळ जवळपास काही मिनिटे सुरू होता. यानंतर महिंद्राने अजिंक्य पवारला खेविण्याची चाल खेळली. त्याने आपल्या एकाच चढाईत  ३गडी टिपत पोलिसांवर पहिला लोण देण्यात मोलाचा वाटा उचलला. सामना संपायला सहा-सात मिनिटे असताना महिंद्राने महाराष्ट्र पोलिसांवर लोण देत २४-१७अशी आघाडी घेतली. येथेच पोलिसांच्या विजयाच्या आशा संपुष्टात आल्या. अजिंक्य पवार, ओमकार जाधव, सुहास वगरे या विजयाचे शिल्पकार ठरले.          महिलांच्या अंतिम सामन्यात उपनगरच्या महात्मा गांधी संघाने गतविजेत्या शिवशक्ती संघाचा ३१-१९ असा सहज पराभव करीत महापौर करंडकावर आपले नाव कोरले. महात्मा गांधी संघाने सुरुवातच एवढी आक्रमक केली की, आठव्या मिनिटाला शिवशक्तीवर लोण देत ९-१अशी आघाडी घेतली. त्यानंतर शिवशक्तीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मध्यांतराला महात्मा गांधी संघाकडे १४-०९ अशी आघाडी होती. हा फरक शेवटच्या पाच मिनिटापर्यंत कायम होता. शेवटची काही मिनिटे शिल्लक असताना शिवक्तीला विजयाची नामी संधी मिळाली होती.त्या वेळी महात्मा गांधी संघात पूजा किणी होती. त्यावेळी पूजाने चढाईत बोनस गुणासह एक  गडी टिपत संघाच्या विजयाच्या आशा शिल्लक ठेवल्या. रक्षा आणि रेखा यांच्या मोक्याच्या क्षणी झालेल्या पकडी शिवशक्तीला पराभवाच्या गर्तेत घेऊन गेल्या. पूजा किणी, सृष्टी चाळके, प्रतीक्षा मांडवकर,तेजस्वीनी पाटेकर या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

टॅग्स :Kabaddiकबड्डी