शहरं
Join us  
Trending Stories
1
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
2
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापरविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
3
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
4
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
5
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
6
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
7
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
8
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
9
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
10
सहचारिणी झाली वैरिण! झोपेच्या ५ गोळ्या दिल्या, उशीनं पतीचं तोंड दाबलं; जीव गेल्याचं कळताच रस्त्यावर फेकून दिलं!
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना उत्तम, नोकरीत पदोन्नती योग; व्यापारात भरभराट, अनुकूल काळ!
12
सलमान, कपिल शर्मानंतर आता 'बिग बॉस' फेम एल्विश यादवच्या घराबाहेर गोळीबार, घबराटीचं वातावरण
13
एकीचं वय ४ अन् दुसरी अवघ्या आठ महिन्यांची, तरीही आईला कीव आली नाही! जन्मदात्रीनेच पोटच्या लेकींना का संपवलं?
14
डोनाल्ड ट्रम्प - व्लादिमीर पुतिन यांच्यातील महाबैठकीत युक्रेन शस्त्रसंधीबाबत करार नाही!
15
ऐतिहासिक दिवस; कोल्हापूर सर्किट बेंचचे आज उद्घाटन; सरन्यायाधीश भूषण गवई उद्घाटक
16
बीएसएनएलच्या कामास चेंबरमध्ये गेलेले तिघे ठार; स्वातंत्र्यदिनी पिंपरी-चिंचवडमधील घटना
17
गाळप क्षमतेबाबत धोरणाची गरज, कारखानदारीस सुरुंग: माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार
18
सीमाप्रश्नावर चर्चेसाठी चिनी परराष्ट्रमंत्री भारत दौऱ्यावर; सुरक्षा सल्लागार अजित डोवालांशी चर्चा करणार
19
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
20
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री

मुंबई-यूपी सामना अनिर्णित

By admin | Updated: November 11, 2015 01:57 IST

हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने फॉलोआॅन मिळाल्यानंतरही यजमान मुंबईविरुद्धचा रणजी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले

मुंबई : हिमांशू असनोरा आणि उमंग शर्मा यांच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर उत्तर प्रदेशने फॉलोआॅन मिळाल्यानंतरही यजमान मुंबईविरुद्धचा रणजी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. उत्तर प्रदेशचा पहिला डाव ४४० धावांत गुंडाळलेल्या मुंबईने त्यांना फॉलोआॅन दिला खरा, मात्र यानंतर उत्तर प्रदेशने संयमी व चिवट फलंदाजी करताना अखेरच्या दिवशी केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात १४० धावा काढून सामना अनिर्णित राखला. यासह मुंबईने ‘ब’ गटात पाच सामन्यांतून २० गुणांसह अव्वल स्थान पटकावले असून उत्तर प्रदेश संघ पाच सामन्यांतून १४ गुणांसह सहाव्या स्थानी आहे.वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी ६१० धावांचा डोंगर उभारल्यानंतर पाहुण्यांना ४४० धावांत गुंडाळून त्यांच्यावर फॉलोआॅन लादला. यानंतर मुंबईने झटपट पहिला बळी घेत उत्तर प्रदेशवर दबाव आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र पहिल्या डावात ९२ धावांची झुंजार खेळी केलेल्या हिमांशू असनोरा याने पुन्हा एकदा मुंबईकरांना दमवले आणि उमंग शर्मासह दुसऱ्या विकेटसाठी नाबाद १२८ धावांची भागीदारी करून सामना अनिर्णित राखण्यात मोलाचे योगदाने दिले. असनोराने १३६ चेंडूत ८ चौकारांसह नाबाद ६८ धावा केल्या. तर दुसऱ्या बाजूने उमंग शर्माने १०९ चेंडूत ४ चौकार व एका षटकारासह नाबाद ६२ धावा फटकावून असनोराला चांगली साथ दिली. विशाल दाभोळकरने सुरुवातीला सलामीवीर एकलव्य द्विवेदीला केवळ ६ धावांवर बाद करून मुंबईला शानदार सुरुवात करून दिली होती. मात्र यानंतर असनोरा - शर्मा यांनी वर्चस्व राखले.तत्पूर्वी ५ बाद ३५० या धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केलेल्या उत्तर प्रदेशला फॉलोआॅन टाळण्यात अपयश आले. दिवसभरात केवळ ९० धावांची भर काढून संपुर्ण संघ बाद झाला. एकलव्य द्विवेदी - पीयूष चावला ही तिसऱ्या दिवसाची नाबाद जोडी अभिषेक नायरने फोडल्यानंतर उत्तर प्रदेशच्या डावाला गळती लागली. द्विवेदी ६६ धावांवर बाद झाला. तर यानंतर नायरने चावलाला देखील बाद करुन मुंबईचा मार्ग मोकळा केला. चावलाने १०९ चेंडूत १२ चौकार व एका षटकारासह ८४ धावा केल्या. भुवनेश्वर कुमार (२२), प्रवीण कुमार (६) आणि अंकित राजपूत (३) हे फारशी चमक न दाखवता बाद झाल्याने उत्तर प्रदेशला फॉलोआॅनच्या नामुष्कीस सामोरे जावे लागले. उत्तर प्रदेशला फॉलोआॅन देताना मुंबईकडून विशाल दाभोळकर आणि अभिषेक नायर यांनी प्रत्येकी ४ बळी घेत निर्णायक कामगिरी केली. तर बलविंदर संधूने एक बळी घेतला.धावफलक मुंबई (पहिला डाव) : १५३ षटकांत ९ बाद ६१० धावा घोषित.उत्तर प्रदेश (पहिला डाव) : १५१ षटकांत सर्वबाद ४४० धावा.उत्तर प्रदेश (दुसरा डाव) : एकलव्य द्विवेदी पायचीत गो. दाभोळकर ६, हिमांशू असनोरा नाबाद ६८, उमंग शर्मा नाबाद ६२. अवांतर - ४. एकूण : ४५ षटकांत १ बाद १४० गोलंदाजी : विशाल दाभोळकर १०-२-३०-१; अभिषेक नायर ४-२-४-०; शार्दुल ठाकूर ४-२-३-०; सिद्धेश लाड ९-२-२६-०; रोहित शर्मा ४-०-१४-०; श्रेयश अय्यर ९-०-४०-०; सूर्यकुमार यादव ५-०-१९-०.