शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
4
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
5
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
6
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
7
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ
8
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
9
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
10
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
11
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
12
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
13
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
14
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
15
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
16
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
17
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
18
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे सांघिक विजेतेपद

By admin | Updated: May 25, 2017 01:20 IST

यंदाचा आयपीएल अंतिम सामना गेल्या १० वर्षातील सर्वात थरारक सामना होता, यावर कोणाचेही दुमत नाही

अयाझ मेमन , संपादकीय सल्लागार

यंदाचा आयपीएल अंतिम सामना गेल्या १० वर्षातील सर्वात थरारक सामना होता, यावर कोणाचेही दुमत नाही. तसं बघायला गेलं तर अखेरच्या चेंडूवर सामना संपणे हे टी-२० प्रकाराला काही नवीन नाही, पण स्पर्धेतील सर्वात निर्णायक सामन्याचा निकाल अशा पद्धतीने लागतो हेच यातील दबाव सिद्ध करतो. या सामन्याचा थरार इतक्या उच्च दर्जाला पोहोचला होता, की खेळाडू आणि पाठीराख्यांवरील दबाव प्रचंड जाणवत होता. विशेष म्हणजे या सामन्यात जवळपास ९० टक्के खेळ पाहून मुंबई इंडियन्सचे तिसरे विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न धुळीस मिळणार आणि रायझिंग पुणे सुपरजायंट चमकदार जेतेपद पटकावणार, असेच चित्र होते. पण, मुंबईने अखेरपर्यंत हार मानली नाही आणि अखेरच्या ३-४ षटकांमध्ये सामन्याचे चित्र पालटताना अवघ्या एका धावेने बाजी मारली. नक्कीच पुण्याच्या संघाचे ‘हार्ट ब्रेक’ झाले, पण अडचणीत आल्यानंतरही मुंबईने अवघ्या १२९ धावांचे केलेले यशस्वी संरक्षण लक्षवेधी ठरले.मुंबईचे विजेतेपद नक्कीच कौतुकास्पद आहे, परंतु हे सर्व शक्य झाले ते जबरदस्त संघनिवड, अप्रतिम योजना आणि मेहनत यामुळे. अनेकदा त्यांच्या कामगिरीने केवळ क्रिकेट नाही, तर इतर क्षेत्रासाठीही प्रयत्न करण्याची शिकवण दिली. मुंबईच्या संघनिवडीने विजेतेपद जिंकण्यासाठी नेमकी कोणत्या गोष्टीची आवश्यकता असते हे सांगितले. सामान्यपणे सांगायचे झाल्यास, मुंबईचा संघ सर्वात समतोल होता. त्यामुळेच, एक किंवा त्याहून अधिक खेळाडू विश्रांतीमुळे किंवा दुखापतीमुळे संघाबाहेर बसले तरी अंतिम अकरामध्ये त्याचा परिणाम घडला नाही. जर, जोस बटलर खेळू शकला नाही, तर त्याची जागा घ्यायला लेंडल सिमन्स सज्ज होता. त्याचप्रमाणे मिशेल मॅक्लेनघनच्या जागी मिशेल जॉन्सन आणि हरभजन सिंगच्या जागी कर्ण शर्मा असे अनेक पर्याय मुंबईकडे उपलब्ध होते. तसेच, मुंबईची बेंच स्टे्रंथही मुख्य संघाइतकीच मजबूत होती. त्यामुळे, मुंबईच्या कामगिरीत शक्यतो घसरण झाली नाही. कॉर्पोरेट भाषेत सांगायचे झाल्यास भविष्यातील विचार यामागचे गुपित आहे. सातत्यपूर्ण कामगिरी आणि दीर्घ काळापर्यंत संघासाठी योगदान देणे अशा गोष्टी विचारात ठेवून खेळाडू रिटेन केले किंवा निवडले. तसेच योजनांबाबत सांगायचे झाल्यास, मुंबई संघ सर्वात कल्पक आणि स्वयंप्रेरित सहजरीत्या भासला नाही आणि यामागचे कारण म्हणजे ते सातत्याने विजयी होत होते. यामागे कोणताही नाट्यमय प्रसंग नव्हता. अनुभवी हरभजन सिंगच्या ऐवजी कर्ण शर्माला पसंती देणे, काहीसा जुगार होता. पण, हे ठरलेले होते. तसेच, कृणाल पांड्याला प्लेआॅफमध्ये खेळविणे, अखेरचे षटक बुमराह किंवा मलिंगाच्याऐवजी जॉन्सनला देणे हेदेखील अपेक्षित होते. शेवटी सांगायचे म्हणजे हे सर्व खेळाडूंची जिद्द होती, की कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. त्यामुळेच अनेक प्रतिकूल परिस्थितीमध्येही मुंबईचा विजय पाहायला मिळाला. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायला पाहिजे, की मुंबईचा एकही फलंदाज अव्वल ५ फलंदाजांमध्ये स्थान मिळवू शकला नाही आणि जसप्रीत बुमराह अव्वल ५ गोलंदाजांमध्ये येणारा एकमेव खेळाडू ठरला. परंतु, एकूण मुंबई इंडियन्सचे खेळाडू इतर खेळाडूंच्या तुलनेत अधिक सामनावीर पुरस्कारविजेते ठरले. थोडक्यात हे सर्व काही यश उत्कृष्ट सांघिक कामगिरीचे आहे.