शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

मुंबई इंडियन्सला वचपा काढण्याची संधी

By admin | Updated: May 1, 2015 01:33 IST

विजयाचा ‘ब्रेक’ मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागच्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने खेळेल.

मुंबई : विजयाचा ‘ब्रेक’ मिळाल्यामुळे आत्मविश्वास दुणावलेला मुंबई इंडियन्स संघ शुक्रवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध मागच्या पराभवाची परतफेड करण्याच्या निर्धाराने खेळेल. अहमदाबाद येथे राजस्थानने मुंबईला नमविले होते. आता मुंबईला आपल्याच मैदानावर वचपा काढण्याची नामी संधी मिळाली आहे. २५ एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबादला पराभूत करून मुंबईने विजयी ब्रेक मिळविला होता. दुसरीकडे, राजस्थान संघ थकलेला जाणवतो. काल बंगळुरू येथे रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध त्यांचा सामना पावसात वाहून गेला होता. २६ एप्रिल रोजी केकेआरविरुद्ध ईडन गार्डनवरील सामनादेखील पावसामुळे होऊ शकला नव्हता. आठ संघांच्या गुणतालिकेत चेन्नईपाठोपाठ रॉयल्स दुसऱ्या स्थानावर आहे. मुंबईने सातपैकी पाच सामने गमावले. हैदराबादविरुद्ध मात्र मलिंगा आणि मिशेल मॅक्लिनगन यांच्या भेदक माऱ्यामुळे मुंबईला विजय साजरा करता आल्याने प्ले आॅफच्या आशा उंचावल्या. या दोघांशिवाय मुंबईचे उर्वरित गोलंदाज आर. विनयकुमार, पवन सुयाल आणि जसप्रीत बुमरा हे अद्याप ‘क्लिक’ होऊ शकले नाहीत. चांगली सलामी जोडी न मिळणे, ही मुंबईची समस्या आहे. मागच्या सामन्यात पार्थिव पटेल लेंडल सिमन्ससोबत सलामीला आला; पण प्रभावी ठरला नव्हता. गुजरातचा रणजी कर्णधार पटेल याने ५ सामन्यांत ७३ धावा केल्या असून, कर्णधार रोहितच्या २४४ धावा आहेत; पण संघात समन्वयाचा अभाव जाणवतो. हरभजनच्या सोबतीला चांगला स्पिनर उपलब्ध नाही. (वृत्तसंस्था) राजस्थान रॉयल्स : शेन वॉटसन (कर्णधार), अभिषेक नायर, अजिंक्य रहाणे, अंकित शर्मा, बेन कटिंग, दीपक हुड्डा, धवल कुलकर्णी, दिशांत याग्निक, जेम्स फॉल्कनर, केन रिचर्डसन, करुण नायर, प्रवीण तांबे, राहुल तेवाटिया, रजत भाटिया, संजू सॅमसन, स्टीवन स्मिथ, स्टुअर्ट बिन्नी, टीम साऊदी, विक्रमजित मलिक, क्रिस मौरिस, जुआन थेरोन, बरिंदर सिंह सरन, दिनेश साळुंके, सागर त्रिवेदी, प्रदीप साहू. मुंबई इंडियन्स :रोहित शर्मा (कर्णधार), अंबाती रायडू, अभिमन्यू मिथुन, आदित्य तारे, पार्थिव पटेल, कीरोन पोलार्ड, कोरी अ‍ॅन्डरसन, लसिथ मलिंगा, हरभजन सिंग, जसप्रीत बुमराह, जोश हेजलवुड, मर्चंट डी लांगे, पवन सुयाल, श्रेयस गोपाल, लेंडल सिमन्स, प्रज्ञान ओझा, मिशेल मॅक्लिगन, एडेन ब्लिझार्ड, अक्षय वखरे, नितीश राणा, सिद्धेश लाड, हार्दिक पंड्या, जगदीश सुचित, उन्मुक्त चंद आणि आर. विनय कुमार.