शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुगुरुजा चॅम्पियन

By admin | Updated: July 16, 2017 02:07 IST

स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिने शनिवारी येथे सेंटर कोर्टवर पाच वेळेसची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा सहज ७-५, ६-0 असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना विम्बल्डन

लंडन : स्पेनच्या गार्बाइन मुगुरुजा हिने शनिवारी येथे सेंटर कोर्टवर पाच वेळेसची चॅम्पियन व्हीनस विल्यम्स हिचा सहज ७-५, ६-0 असा सरळ सेट्समध्ये पराभव करताना विम्बल्डन महिला एकेरीचे ग्रँडस्लॅमचे विजेतेपद पटकावले.मुगुरुजाने सुरेख खेळ करताना व्हीनसचा ७७ मिनिटांत पराभव करताना इतिहास रचण्याच्या तिच्या अपेक्षांवर पाणी फेरले आणि अशा प्रकारे ती विम्बल्डन जिंकणारी दुसरी स्पेनिश खेळाडू ठरली. ती दोन वर्षांपूर्वी पहिल्या विम्बल्डन फायनलमध्ये व्हीनसची बहीण सेरेनाकडून पराभूत झाली होती.मुगुरुजाची विद्यमान प्रशिक्षक कोचिंता मार्टिनेज हिने १९९४ मध्ये विम्बल्डनमध्ये स्पेनचा झेंडा फडकावला होता. त्या वेळेस तिने फायनलमध्ये मार्टिना नवरातिलोवा हिचा पराभव केला होता. या २३ वर्षीय खेळाडूने विजयानंतर म्हटले, ‘‘पहिला सेट कठीण होता. आम्हा दोघींनाही संधी होती; परंतु मिळालेल्या संधीचा फायदा घेतल्याने मी खुश आहे. दोन वर्षांआधी मी सेरेनाविरुद्ध फायनलमध्ये पराभूत झाले होते आणि त्या वेळेस तिने एक दिवस मी विजेतेपद पटकावेल असे सांगितले होते. आज अखेर हे सिद्ध झाले.’’ व्हेनेजुएला येथे जन्मलेल्या मुगुरुजा हिने गेल्या वर्षी फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. हे तिचे दुसरे ग्रँडस्लॅम विजेतेपद आहे. तिने अशा प्रकारे व्हीनसचा ओपन युगातील सर्वात वयस्कर विम्बल्डन चॅम्पियन्सचा प्रयत्न फोल ठरवला. व्हीनसने आठ वर्षांनंतर अंतिम फेरी गाठली. तिला सहाव्यांदा आॅल इंग्लंड क्लब विजेतेपद जिंकण्याची आशा होती. तिने नऊ वर्षांआधी विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले होते. १० व्या मानांकित ३७ वर्षीय व्हीनसने याआधी २०००, २००१, २००५, २००७ आणि २००८ मध्ये विम्बल्डनचे विजेतेपद पटकावले आहे. शनिवारी अंतिम फेरीतील पहिला सेट संघर्षपूर्ण ठरला. प्रत्येक गुणासाठी दोन्ही प्रतिस्पर्धींनी एकमेकांना चांगली झुंज दिली. दोघींची पहिल्या सेटमध्ये ४-४, ५-५ अशी बरोबरी होती. अखेर टायब्रेकरपर्यंत खेचल्या गेलेला हा सेट मुगुरुजाने ७-५ असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये मात्र मुगुरुजा हिचेच वर्चस्व राहिले व तिने दुसरा सेट ६-० असा सहज जिंकताना विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.