आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एम.एस.एम.चा संघ अजिंक्य
By admin | Updated: September 1, 2014 21:34 IST
नाईक महाविद्यालयाला उपविजेतेपद
आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एम.एस.एम.चा संघ अजिंक्य
नाईक महाविद्यालयाला उपविजेतेपदऔरंगाबाद : एमजीएम येथे नुकत्याच झालेल्या आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत एमएसएम शारीरिक शिक्षण महाविद्यालयाने विजेतेपद पटकावले. नाईक महाविद्यालयाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.विजेतेपद पटकावणारा एमएसएम संघ : बळीराम पायघन, प्रणव अहिरे, कैलास गुंजाळ, गोरख पवार, महेंद्र वानखेडे, भरतकुमार खत्री, गणेश राठोड, दीपक चंदनसे, रावसाहेब गेंदाफळे, अक्षय शिंदे, संग्राम बुकनार, अजय कंदारे. मार्गदर्शक : डॉ. माणिक राठोड, व्यवस्थापक : मुरली राठोड. उपविजेता नाईक महाविद्यालयाचा संघ : मयूर शिवतकर, किशोर धुमाळ, सुनील दुबिले, कृष्णा करले, कृष्णा पांढरे, पवन चव्हाण, नवनाथ चव्हाण, रोहित शिवतकर, राहुल राठोड, रईस शेख, अजय चव्हाण, संदीप राठोड. प्रशिक्षक : प्रा. युवराज राठोड, व्यवस्थापक : सत्यजित पगारे. जलतरण स्पर्धेत २00 मीटर ब्रेस्ट स्ट्रोक प्रकारात नळदुर्गच्या सामी बडगुजरने प्रथम, भारत महाविद्यालयाच्या गौरव धोत्रेने द्वितीय आणि एमआयटी महाविद्यालयाच्या तुषार यादवने तृतीय क्रमांक मिळवला. कबड्डीत उपविजेतेपद पटकावणार्या संघाचे संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड, सचिव नितीन राठोड, बिपीन राठोड, प्रभारी प्राचार्य मिलिंद उबाळे, उपप्राचार्य सुरेश भाले आदींनी अभिनंदन केले. (क्रीडा प्रतिनिधी)