शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

क्रीडा क्षेत्रातील हालचालींना वेग, सामने प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2020 00:36 IST

आता सुरू होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. याचा आनंद टीव्ही व डिजिटल माध्यमातूनच घेतला जाऊ शकेल.

- अयाझ मेमनकोरोना महामारीमुळे मार्च महिन्यापासून पूर्णत: थांबलेल्या क्रीडा क्षेत्रात थोडीफार हालचाल दिसू लागली आहे. बुंदेसलिगा या जर्मन फुटबॉल लीगला शनिवारी सुरुवात झाली, तर आॅस्ट्रेलियातील राष्ट्रीय रग्बी लीग २८ मे रोजी सुरूहोणार आहे.त्याचबरोबर अमेरिकन बास्केटबॉल (एनबीए) व बेसबॉल (एमएलबी) लीगही लवकरच सुरूकरण्याचा प्रयत्न आहे. आता सुरू होणारे सर्व सामने हे प्रेक्षकांविना स्टेडियमवर खेळविले जाणार आहेत. याचा आनंद टीव्ही व डिजिटल माध्यमातूनच घेतला जाऊ शकेल. जोपर्यंत कोविड-१९ वर एखादी लस सापडत नाही तोपर्यंत अशाचप्रकारे सामने आयोजित करावे लागणार आहेत. याासाठी वर्षभराचा काळ लागू शकतो, असा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचा अंदाज आहे.प्रेक्षकांची उपस्थिती हा कोणत्याही खेळाचा प्राण असतो; मात्र आता अशा प्रकारच्या सामन्यांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतो हे पाहावे लागणार आहे. रिकाम्या स्टेडियमवर खेळताना खेळाडूंना पाहणे प्रेक्षकांना कितपत रुजेल हे सांगणे कठीण आहे. आता तंत्रज्ञान खूपच विकसित झाले आहे. त्यामुळे तंत्राच्या मदतीने मैदानावर प्रेक्षकांची उपस्थिती दाखविणे शक्य होऊ शकते. खेळाडूंना प्रेक्षकांसमोर खेळल्याचा अनुभव दिला जाऊ शकतो. कोविड नंतरच्या जगात कशा प्रकारचे जीवन जगावे लागणार आहे. आपल्या आयुष्यात कोणते बदल होणार आहेत, याची ही थोडीशी झलकच आहे.मी माझ्या टिष्ट्वटर अकाऊंटवर या संदर्भात एक चाचणी घेतली. यात मी विचारले होेते की, रिकाम्या स्टेडियमवर सामने घेण्याचा विचार योग्य वाटतो? यावर मला काही पर्याय देण्यात आले, ते असे १) होय, आम्हाला पुन्हा सामने हवेत २) माफ करा, मी पाहू शकत नाही ३) कोणत्याही मार्गाने सामने खेळवा, काही फरक पडत नाही ४) मी वाट पाहीन आणि ठरवेन.विशेष म्हणजे ६४८ लोकांपैकी ५८ टक्के लोकांनी पहिल्या पर्यायाला पसंती दिली. यावरूनच लोकांना सामने सुरू होण्याची किती प्रतीक्षा आहे हे दिसून येते. मी लिहित असताना अद्याप बुंदेसलिगा सुरूझाली नव्हती. या आणि आगामी आठवड्यात सुरूहोणाऱ्या क्रीडा स्पर्धांना प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात, हे महत्त्वाचे असेल.दरम्यान, भारतीय क्रिकेट रसिकांबरोबरच जगभरातील क्रिकेटपटू व प्रेक्षकांना आयपीएलबाबत काय याची उत्सुकता लागली आहे. यावर्षी ही स्पर्धा होणार का? याऐवजी टी-२० वर्ल्ड चॅम्पियनशिप खेळविली जाईल, असा प्रश्न विचारला जात आहे.याचे माझ्याकडे कोणतेही ठोस उत्तर नाही. मात्र, रवी शास्त्री यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे की, यावर्षी कोणत्याही मोठ्या आंतरराष्टÑीय स्पर्धांऐवजी स्थानिक स्पर्धा व द्विपक्षीय मालिका खेळविल्या जाण्यावर भर दिला जाईल. आयपीएल ही स्थानिक स्पर्धा असल्याने याकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे.आयसीसीने २ मे रोजी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये आगामी चार महत्त्वाच्या स्पर्धांवर चर्चा केली. यात कोविड-१९ सावटाखाली टी-२० विश्वचषक खेळवायचा का, यावरही चर्चा झाली.मात्र, ही स्पर्धा २०२२ पर्यंत पुढे ढकलावी, असा चर्चेत सूर होता. ही स्पर्धा आयोजित करणाºया आॅस्ट्रेलियाचाही याला विरोध नव्हता असे कळते. पुढील दहा दिवस क्रीडा प्रशिक्षकांसाठी मोठ्या डोकेदुखीचे असतील, हे मात्र नक्की!

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या