शहरं
Join us  
Trending Stories
1
माळेगाव निकाल: पहिल्या फेरीअखेर अजित पवार गटाचे १७, तावरे गटाचे चार उमेदवार आघाडीवर
2
IND vs ENG: जसप्रीत बुमराह कुठले सामने खेळणार? कर्णधार शुबमन गिलने लगेचच दिलं उत्तर, म्हणाला- "मोठा ब्रेक..."
3
सोलापूरात विमान लँड होताच समोर आला कुत्रा; पायलटची उडाली भंबेरी, सुरक्षा रक्षकही धास्तावले
4
"मी पहिल्याच रात्री त्याला स्पर्श करू दिला असता, पण..."; सिताराचा दावा, पतीवर गंभीर आरोप
5
इराणच्या अणुकेंद्रांवरील हल्ला निष्फळ, अमेरिकेचा गोपनीय अहवाल फुटल्याने खळबळ, ट्रम्प म्हणाले... 
6
आणीबाणीला आज ५० वर्षे पूर्ण, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल!
7
भारताचा चीनवर पलटवार, दिला झटका; ६ उत्पादनांवर लावलं अँटी डम्पिंग शुल्क, का घेतला निर्णय?
8
अभिनंदन यांना पकडणारा पाकिस्तानी ऑफिसर ठार; कोणी केली पाक जवानाची हत्या?
9
युद्धाचा भारताला फटका! १ लाख टन बासमती तांदूळ बंदरात अडकला, २००० कोटींवर टांगती तलवार?
10
लेट पण थेट! सोनाली कुलकर्णीने फॉलो केला ट्रेंड, 'एक नंबर तुझी कंबर' वर थिरकली
11
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
12
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
13
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
14
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
15
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
16
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
17
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
18
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
19
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
20
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा

संगकाराच्या वर्षात सर्वाधिक धावा

By admin | Updated: December 17, 2014 01:27 IST

श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज कुमार संगकारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे़

कोलंबो : श्रीलंकेचा वरिष्ठ फलंदाज कुमार संगकारा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा बनविण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे़ त्याने आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे सारून हा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे़ लंकेच्या या डावखुऱ्या फलंदाजाने इंग्लंडविरुद्धच्या सातव्या आणि अखेरच्या वन-डे सामन्यात सहावी धाव घेतली आणि एका वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत अव्वल स्थान मिळविले़ आॅस्ट्रेलियाच्या पाँटिंगने २००५ मध्ये कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यात एकूण २,८३३ धावा केल्या होत्या, तेव्हापासून एका वर्षात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्याच नावे होता़ आता संगकारा याने यावर्षी कसोटी, वन-डे आणि टी-२० सामन्यांत एकूण २,८३४ धावा केल्या आहेत़ संगकाराने यावर्षी कसोटीत १,४८६ धावा केल्या आहेत, तर वन-डेमध्ये १,२५६ आणि टी-२० मध्ये ११९ धावा केल्या आहेत़ दरम्यान, संगकाराने पुढील वर्षी आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये होणाऱ्या वन-डे वर्ल्डकपनंतर निवृत्तीची घोषणा केली आहे़ त्यामुळे इंग्लंडविरुद्ध मायदेशातील त्याचा अखेरचा सामना मानला जात आहे़ (वृत्तसंस्था)यावर्षी संगकाराव्यतिरिक्त त्याचा संघातील सहकारी एंजेलो मॅथ्युज याने यावर्षी आतापर्यंत २,५५१ धावा केल्या आहेत, तर त्यानंतर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याचा क्रमांक लागतो़ त्याने वन-डे, कसोटी आणि टी-२० मध्ये एकूण २,०४३ धावा केल्या आहेत़ (वृत्तसंस्था)