शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मोहम्मद आमिरचे सुवर्णपदक थोडक्यात हुकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 03:37 IST

अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले.

- रोहित नाईक विशाखापट्टणम : अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत महाराष्ट्राचा शरीरसौष्ठवपटू मोहम्मद आमिर याला राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत सुवर्णपदकापासून थोडक्यात मुकावे लागले. उत्कृष्ट सादरीकरण आणि शानदार शरीरयष्टीच्या जोरावर यजमान आंध्र प्रदेशच्या के. श्रीनिवास याने आमिरला मागे टाकले.इंडियन बॉडीबिल्डिंग फेडरेशनच्या (आयबीबीएफ) प्रथमच विशाखापट्टणम येथील गुरजाडा कलाक्षेत्रम येथे सुरू असलेल्या हिल्स, वॅलीस आणि माऊंटन्स (एचव्हीएम) या राष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेत महाराष्ट्राच्या मोहम्मद आमिरने ६० किलो वजनी गटात सर्वांचे लक्ष वेधले. मात्र सुवर्णपदक पटकावण्यापासून तो थोडक्यात अपयशी ठरला. प्राथमिक फेरीमध्ये २७ सहभागी खेळाडूंमधून वर्चस्व राखत दिमाखात अंतिम फेरी गाठलेल्या आमिरकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. मोक्याच्यावेळी शानदार सादरीकरण केलेल्या श्रीनिवास याने काही गुणांच्या जोरावर बाजी मारत सुवर्णपदकावर स्वत:चे नाव कोरले. श्रीनिवासच्या धडाक्यापुढे अखेर आमिरला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. त्याचवेळी, आंध्र प्रदेशच्याच एस. के. रेहमान याने कांस्यपदकावर कब्जा केला. तसेच सोहम सरकार आणि सुनंदन बॅनर्जी या पश्चिम बंगालच्या खेळाडूंना अनुक्रमे चौथ्या व पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले.याआधी झालेल्या ५५ किलो वजनी गटातूनही महाराष्ट्र व विदर्भाच्या शरीरसौष्ठवपटूंनी छाप पाडताना लक्षवेधी कामगिरी केली.पुरुषांच्या ८ वजनी गटामध्ये आणि महिलांच्या गटामध्ये होत असलेल्या या स्पर्धेत प्रामुख्याने आदिवासी खेळाडूंना राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. स्पर्धेतील पुरुष व महिला गटातील विजेत्यांना अनुक्रमे ‘एचव्हीएम मिस्टर इंडिया’ व ‘एचव्हीएम मिस इंडिया’ किताब देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेत सहभागी २५० खेळाडूंपैकी ७० खेळाडू आदिवासी समाजाचे आहेत.