शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मोदीविषयक खेळाडूंच्या प्रतिक्रीया

By admin | Updated: May 21, 2014 00:47 IST

मोदींनी क्रीडा क्षेत्राकडे लक्ष घालावे:दत्ता बडगूमोदी लाटेमुळे सोलापूरसह संपूर्ण देशात भाजपाची एकहाती सत्ता आली़ त्यामुळे आगामी पाचवर्षे तरी सरकारला स्थैर्य लाभेल असे वाटते़ मोदींनी संपूर्ण देशातील युवकांना प्रेरणा दिली आहे़ त्यांनी क्रीडा क्षेत्राकडेदेखील जातीने लक्ष घातले पाहिजे़ खेळातील बोकाळलेला भ्रष्टाचार दूर सारून खेळाडूंना उर्जा देण्याचे काम करावे़ ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी ...


मोदींनी क्रीडा क्षेत्राकडे लक्ष घालावे:दत्ता बडगू
मोदी लाटेमुळे सोलापूरसह संपूर्ण देशात भाजपाची एकहाती सत्ता आली़ त्यामुळे आगामी पाचवर्षे तरी सरकारला स्थैर्य लाभेल असे वाटते़ मोदींनी संपूर्ण देशातील युवकांना प्रेरणा दिली आहे़ त्यांनी क्रीडा क्षेत्राकडेदेखील जातीने लक्ष घातले पाहिजे़ खेळातील बोकाळलेला भ्रष्टाचार दूर सारून खेळाडूंना उर्जा देण्याचे काम करावे़ ग्रामीण भागातील खेळाडूंसाठी नवनवीन उपक्रम राबविले पाहिजेत़ जेणेकरून आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जेदार खेळाडूंनी निर्मिती होईल़
------------------------------------------------------
ग्रामीण भागातील खेळाडूंना संधी द्यावी: राजेश येमूल
देशात नव्याने मोदी सरकार येत आहेत़ निवडणूकीच्या निकालापर्यंत अच्छे दिन आने वाले है असे म्हटले जायचे़ आता मोदींच्या रुपाने देशाला नवे पंतप्रधान लाभणार आहेत़ त्यामुळे आगामी काळात क्रीडा क्षेत्रात मोठे बदल घडून येतील आणि नवी दिशा मिळेल असे वाटते़ देशातील संपूर्ण तरुणांच्या नजरा आता मोंदी शासनाकडे लागून राहिले आहे़ त्यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत़ खेळाडूंनादेखील परिवर्तन अपेक्षित आहेत़ परिवर्तनाची लाट क्रीडा क्षेत्रातही आले पाहिजेत़ त्यामुळे नक्कीच क्रीडा क्षेत्राचा विकास होईल़
----------------------------------------------------
महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न सोडवावा: नीलेश गायकवाड
भारतात मोठ्या प्रमाणावर महिला खेळाडू उदयास येत आहेत़ ग्रामीण भागातील अनेक महिला खेळाडूंना अद्यापही मार्ग सापडत नाही आहे़ त्यांना मार्गदर्शनाची गरज आहे़ ग्रामीण भागातील महिला खेळाडूंनी मोठ्या प्रमाणावर शोषण केले जात आहे़ त्यामुळे महिला खेळाडूंसह घरातील पालक देखील त्यांना अन्यत्र पाठविण्यास सहमती देत नाहीत़ त्यामुळे त्यांचा विकास घुंटत असतो़ देशपातळीवर महिला खेळाडूंची उणीव भासते आणि भारत देश क्रीडा क्षेत्रात मागास राहतो़
--------------------------------------------------
मोदींमुळे युवकांना नवीन उर्जा मिळेल: शुभम चव्हाण
संपूर्ण देशभर पिंजून काढणारे नरेंद्र मोदी अखेर सत्तारुढ होताना दिसून येत आहेत़ मोदी लाटेमुळे देशातील भ्रष्टाचार दूर होईल आणि देशाचा विकास होईल असे वाटत आहे़ मोदींचे व्यक्तिमत्त्व पाहता युवकांना ते नक्कीच प्रेरणादायी ठरतील अशी अपेक्षा आहे़ युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ते नक्कीच जातीने लक्ष्य घालतील आणि खास करून क्रीडा क्षेत्रातील युवकांना खेळाच्या माध्यमातून नवीन रोजगार निर्मिती मिळवून देतील़
----------------------------------------
पदकांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल:शुभम कोठारी
मोदी लाटेमुळे देशातील युवकांमध्ये एक वेगळा उत्साह संचारला आहे़ ज्या पद्धतीने मोदी यांनी आपल्या पक्षाला बहुमत मिळवून सत्तेवर आणले त्याचप्रमाणे युवकांसाठी कल्याकणारी योजना राबवावेत़ ग्रामीण भागातील क्रीडा विकासासाठी नव्या योजना राबवून त्यांना आर्थिक पाठबल दिल्यास भारताचे आंतराष्ट्रीय पातळीवर नक्कीच पदकांच्या संख्येत वाढ होईल़ आणि क्रीडाक्षेत्रातही भारत भरारी घेईल़
-------------
खेळाडूंसाठी नोकरी उपलब्ध करून द्याव्यात: रोहित जाधव
अनेक गुणी खेळाडू बेरोजगारीमुळे हलाखीचे दिवस काढत आहेत़ त्यांच्यासाठी कोणत्याही प्रकारची योजना कार्यान्वित नाही़ त्यामुळे नव्याने सत्तेवर येणार्‍या मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या गुणी खेळाडूंसाठी मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात़ जेणेकरून खेळाडूंचे भवितव्य उज्ज्वल होईल़ ग्रामीण भागात गुणवत्ता असूनही दर्जेदार खेळाडूंचा अभाव आहे़ यासाठी विविध योजना, उपक्रम राबवून गुणी खेळाडूंना एक व्यासपीठ निर्माण करून द्यावेत़ महिला खेळाडूंच्या सुरक्षिततेचा प्रश्न अद्यापही ऐरणीवर आहे़ महिलांच्या सुरक्षिततेसाठी विषेश अशा योजना आखाव्यात़