नवी दिल्ली : पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करीत अंधांचा टी-२० विश्वचषक पटकाविणाऱ्या चॅम्पिन्स टीमची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. त्यांनी खेळाडूंशी संवाद साधला. या खेळाडूंसोबत संवाद साधल्याचा आंनद झाल्याचे मोदींनी म्हटले आहे. त्यांनी टिष्ट्वटर हॅण्डलवर पोस्ट केले की, अंधांचा विश्वचषक जिंकणाऱ्या माझ्या चॅम्पियन्स संघाचे अभिनंदन. तुम्ही असेच खेळत राहा आणि भारताला गौरवित करा. टीममधील प्रत्येक सदस्याने मोदींसोबत छायाचित्र काढले आणि टिष्ट्वटवर पोस्ट केले. ‘खेळाडूंबरोबरच त्यांचे प्रशिक्षक, माता-पिता, मित्र आणि शिक्षकांचे अभिनंदन करतो. ज्यांनी त्यांच्या या प्रवासात त्यांना साथ दिली, असे मोदींनी म्हटले आहे.
अंध क्रिकेट चॅम्पियन्स टीमला मोदींची भेट
By admin | Updated: March 1, 2017 00:18 IST