शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
3
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
4
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
5
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
6
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
7
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
8
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
9
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
10
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
11
गॅस सिलेंडर घेताना या बाबींची करा पडताळणी, टळेल संभाव्य धोका
12
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
13
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
14
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
15
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
16
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
17
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
18
Photo: देशातील नंबर-१ इलेक्ट्रिक स्कूटरचे नवीन मॉडेल लॉन्च, एका चार्जवर १२१ किमी धावणार!
19
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
20
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

मो. आमिरवरील बंदी आयसीसीकडून शिथिल

By admin | Updated: January 30, 2015 00:45 IST

पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला आज, गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा

दुबई : पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला आज, गुरुवारी मोठा दिलासा मिळाला आहे. स्पॉट फिक्सिंग प्रकरणात पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरा जात असलेल्या या गोलंदाजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या २०१० च्या इंग्लंड दौऱ्यात २२ वर्षीय आमिरला स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे ६ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती. त्यानंतर त्याला क्रिकेटमध्ये ५ वर्षांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले. आयसीसी बोर्डाच्या आज संपलेल्या दोनदिवसीय बैठकीनंतर आयसीसीने स्पष्ट केले की, ‘आयसीसी भ्रष्टाचार विरोधी व सुरक्षा समितीचे अध्यक्ष सर रोनी फ्लानागन यांनी आयसीसी बोर्ड व पीसीबीशी चर्चा केल्यानंतर आपल्या अधिकारांचा वापर करीत आमिरला स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी दिली.’मॅच फिक्सिंग प्रकरणात आमिरवरील पाच वर्षांच्या बंदीच्या शिक्षेची मुदत २ सप्टेंबर २०१५ मध्ये संपणार आहे; पण आता तो पाकच्या स्थानिक क्रिकेटमध्ये खेळणार आहे. (वृत्तसंस्था)ण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. आयसीसीने स्पष्ट केले की, अध्यक्षांनी भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम ६.८ मध्ये उल्लेख असलेल्या आपल्या अधिकाराचा वापर केला. ते आमिरच्या उत्तरवर समाधानी दिसले. चौकशीदरम्यान आमिरने सहकार्य केले. चौकशीदरम्यान आमिरने जे काही घडले ते सविस्तरपणे कथन केले आणि आपली चूक कबूल केली.स्पॉट फिक्सिंग प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर आमिरने आपली चूक कबूल केली होती, पण आसिफ व बट यांनी न्यायालचाये द्वार ठोठावले. त्यात त्यांचा गुन्हा सिद्ध झाला. लंडनच्या न्यायालयाने दोघांना तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. आसिफवर क्रिकेटमध्ये ७ वर्षांची तर बटवर १० वर्षांची बंदी घालण्यात आली. (वृत्तसंस्था)