शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

भरतनाट्यम डान्सर बनण्याचं होतं मितालीचं स्वप्न

By admin | Updated: July 13, 2017 10:21 IST

धावांचा डोंगर सर करणाऱ्या मितालीचं लहानपणीचं स्वप्न एकदम वेगळं होतं.

ऑनलाइन लोकमत

हैदराबाद, दि. 13- भारताची स्टार फलंदाज मिताली राज हिने महिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नोंदवला. इतकंच नाही, तर ६००० धावा करणारी ती पहिली महिला क्रिकेटपटूही बनली आहे. पण धावांचा डोंगर सर करणाऱ्या मितालीचं लहानपणीचं स्वप्न एकदम वेगळं होतं. तिला लहान असताना क्रिकेटमध्ये काहीही रस नव्हता. लहानपणापासूनच मिताली राज हिला भरतनाट्यम डान्सर बनायचं होतं. तिने भरतनाट्यमचं शिक्षणही घेतलं आहे. मिताली 10 वर्षांची असताना ती उत्तम क्रिकेटर होइल, असं भाकीत तिचे कोच संपत कुमार यांनी केलं होतं. त्याचं ते भाकीत आज खरं झालं आहे.   
 
मितालीचे वडील दोराई राज ती 10 वर्षाची असताना सिंकदराबादमधील सेंट जॉर्न कोचिंग कॅम्पमध्ये घेऊन जायचे. मितालीला उशिरा उठायची सवय होती. पण तिच्या वडिलांनी तीची सवय मोडून तिला लवकर उठायची सवय लावली.  मितालीचा भावाला क्रिकेट कोचिंगसाठी पाठवताना मितालीलाही तिचे वडील कॅम्पमध्ये घेऊन जायचे. त्यावेळी दोराई राज यांचे मित्र ज्योती प्रसाद यांनी मितालीच्या भावाऐवजी मिताली उत्तम क्रिकेटर बनू शकते, असं सांगितलं होतं. त्यामुळे मुलाऐवजी तुमच्या मुलीच्या ट्रेनिंगसाठी लक्ष केंद्रीत करावं, असं तिच्या वडिलांना सांगितलं होतं. तिथूनच मितालीचा क्रिकेटमधील प्रवास सुरू झाला. ही सविस्तर माहिती मिताली राज हिच्या वडिलांनी द टाइम्स ऑफ इंडियाला दिली आहे. 
 
आणखी वाचा
 

धावांच्या एव्हरेस्टवर मिताली ‘राज’!

मिताली राजला शुभेच्छा देताना विराट कोहलीची झाली "गोची"

महिला विश्वकप क्रिकेट : भारताचा 8 विकेट्सनी पराभव

सेंट जॉन कोचिंग सेंटर मुलांचा कॅम्प असल्याने तेथे मितालीने थोड्या कालावधीसाठीच ट्रेनिंग घेतलं. त्यानंतर ज्योती प्रसाद यांनी केयेस स्कूलमध्ये मितालीला ट्रेनिंगसाठी नेण्याचा सल्ला दिला. पण त्या ट्रेनिंग सेंटरमध्ये असलेले कोच संपत कुमार अत्यंत शिस्तप्रिय आणि कडक असल्याचं सांगितलं होतं. तेथे मितालीचं ट्रेनिंग सुरू झाल्यानंतर काही वर्षातच, संपत कुमार यांनी मिताली भारतासाठी फक्त खेळणार नाही, तर ती धावांच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड तयार करेल, असं तिच्या वडिलांना सांगितलं. कोच संपत कुमार यांचे ते शब्द आता प्रत्यक्षात उतरले आहेत, अशी भावनाही मितालीच्या वडिलांनी व्यक्त केली आहे. 

26 जून 1999 मध्ये आयलँडविरूद्ध झालेल्या सामन्यात मितालीने 114 धावा केल्या होत्या. तेव्हा शतक झळकवणारी ती सगळ्यात तरूण खेळाडू ठरली होती. 
१६ वर्षे २०५ दिवस एवढे वय असताना मितालीने महिला एकदिवसीय क्रिकेटमधील पहिलं शतक झळकाविले. ती सर्वांत तरुण फलंदाजी ठरली. १७ वर्षांखालील कोणत्याही महिला फलंदाजाला अशी कामगिरी करता आलेली नाही.