शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

मिशेल जॉन्सनची निवृत्ती

By admin | Updated: November 18, 2015 04:03 IST

आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या क सोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

पर्थ : आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनने न्यूझीलंडविरुद्धच्या क सोटी मालिकेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. पर्थ येथील वाका मैदानावर मंगळवारी पाचव्या दिवसाच्या खेळापूर्वी बोलताना ३४ वर्षीय जॉन्सन म्हणाला, ‘निवृत्ती स्वीकारण्याची हीच योग्य वेळ आहे. माझी कारकीर्द शानदार ठरली. पण कधी ना कधी हा प्रवास संपणार होता आणि वाकावर हा प्रवास थांबविणे विशेष आहे.’यापूर्वी इंग्लंडविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेनंतर मायकल क्लार्क, ब्रॅड हॅडिन, रॅन हॅरिस, ख्रिस रोजर्स आणि शेन वॉटसन यांच्यासारख्या खेळाडूंनी निवृत्तीची घोषणा केली. न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी जॉन्सनच्या भविष्याबाबत चर्चा सुरू झाली होती. कारण हा वेगवान गोलंदाज गेल्या आठवड्यात निवृत्तीबाबत विचार करीत असल्याचे म्हटले होते. वाका जॉन्सनसाठी गृहमैदान आहे. ७३ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत जॉन्सनने या मैदानावर अनेकदा चांगली गोलंदाजी केली आहे; पण न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पहिल्या डावात त्याची कामगिरी निराशाजनक ठरली. त्याला १५७ धावांच्या मोबदल्यात केवळ १ बळी घेता आला. या एकमेव बळीच्या जोरावर जॉन्सनने आॅस्ट्रेलियातर्फे सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत ब्रेट ली याला पिछाडीवर सोडताना चौथे स्थान पटकावले. जॉन्सन ३११ बळींसह चौथ्या स्थानी आहे. आॅस्ट्रेलियातर्फे शेन वॉर्न (७०८), ग्लेन मॅक् ग्रा (५६३) आणि डेनिस लिली (३५५) यांनी जॉन्सनपेक्षा अधिक बळी घेतले आहेत. चौथ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आपल्या संघसहकाऱ्यांना या निर्णयाबाबत सांगताना जॉन्सन म्हणाला,‘मी या निर्णयावर बराच विचार केला. या सामन्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कामगिरीत सातत्य राखण्यात यशस्वी ठरेल, याबाबत साशंकता आहे. बॅगी ग्रीनसाठी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे. (वृत्तसंस्था)क्वीन्सलॅँडतर्फे २००१ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या जॉन्सनला २००७ मध्ये कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. स्थानिक क्रिकेटमध्ये तो पश्चिम आॅस्ट्रेलिया संघाचे प्रतिनिधित्व करीत होता. जॉन्सनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी २००८ मध्ये वाका मैदानावर केली होती. त्या वेळी त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ६१ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले होते. आयसीसीचा वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून मान मिळवणाऱ्या जॉन्सनने १५३ वन-डे मध्ये २३९ बळी घेतले. जॉन्सन म्हणाला, ‘मला कारकिर्दीत चढ-उतार अनुभवाला आले, पण मी सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याचा मला अभिमान आहे.’ जॉन्सनने आॅस्ट्रेलियातर्फे ३० टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले. तो तळाच्या फळीत उपयुक्त फलंदाज होता. कसोटी क्रिकेटमध्ये त्याची सर्वोच्च खेळी आहे नाबाद १२३ धावांची. त्याने ११ अर्धशतके झळकावली आहेत.