बंगळुरू : बंगळुरू शहराच्या हॉटेलमध्ये कथितपणे एका महिलेचा छळ केल्याचा आरोप असणारा भारतीय लेगस्पिनर अमित मिश्रा याने बंगळुरू पोलिसांच्या एसएमएसला गुरुवारी उत्तर दिले. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सध्या सुरू असलेल्या मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट असलेल्या मिश्राला बंगळुरू पोलिसांनी एका महिलेसोबत कथित मारहाणप्रकरणी नोटीस पाठवली होती.२५ सप्टेंबरला हॉटेलमध्ये एका महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप मिश्रावर आहे. पोलीस सूत्रांनुसार मिश्राने पोलिसांच्या एसएमएसचे उत्तर दिले. पोलीस ई-मेल, टेलिफोन कॉलसह इतर माध्यमांतून त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करीत होते. मिश्रा चौकशी अधिकाऱ्यांसमोर आपली बाजू मांडेल व त्यानंतर दोघांचे जबाब ऐकून घेतले जातील. जबाबात चूक आढळल्यास त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल होईल. ‘ती’ तक्रार मागे घेणारअमित मिश्राविरुद्ध कथित मारहाणप्रकरणी केलेली तक्रार मागे घेण्याचा निर्णय त्या महिलेने घेतला आहे. कोणत्याही दबावाला बळी न पडता, ही निर्णय घेतल्याचे तीने म्हटले.
पोलिसांच्या एसएमएसला मिश्राचे उत्तर
By admin | Updated: October 23, 2015 01:35 IST