शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

मीराबाई चानूचे ‘सुवर्ण’ यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 04:32 IST

कतार आंतरराष्ट्रीय भारोत्तोलन; ४९ किलो गटात राखला दबदबा

दोहा : भारतीय स्टार आणि माजी विश्वविजेती भारोत्तोलनपटू मीराबाई साईखोम चानू हिने शुक्रवारी सहाव्या कतार आंतरराष्ट्रीय चषक स्पर्धेत ४९ किलो गटात सुवर्ण पदक जिंकून भारताच्या पदकांचे खाते उघडले. चानूने आॅलिम्पिक पात्रता स्पधोत १९४ किलो वजन उचलून सुवर्ण जिंकले. टोकियो आॅलिम्पिकच्या अंतिम रँकिंगच्यावेळी मीराबाईला या जेतेपदाचा लाभ होणार आहे. त्याचवेळी, जेरेमी लालरिनुंगाने पुरुष गटात रौप्य पदकावर नाव कोरले.टोकियो आॅलिम्पिकमध्ये पात्रता गाठण्यासाठी एका भारोत्तोलनपटूला नोव्हेंबर २०१८ ते एप्रिल २०२० या कालवधीत प्रत्येक सहा महिन्यात किमान एक व एकूण सहा स्पर्धा खेळणे अनिवार्य असते. याशिवाय प्रत्येक खेळाडूला किमान एक सुवर्ण जिंकावेच लागते. मीराबाईची सर्वोत्कृष्ट कामगिरी २०१ किलो वजन उचलण्याची आहे.चानूने स्रॅच तसेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये केवळ एक लिफ्ट केली. तिने स्रॅचमध्ये ८३ तसेच क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १११ किलो वजन उचलण्याची कामगिरी केली. दुखापतग्रस्त झाल्यामुळे मीराबाई २०१८ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेमध्ये तसेच त्यानंतरच्या आशियाई स्पर्धेत खेळू शकली नाही.त्याचवेळी, पुरुषांमध्ये ६७ किलो वजनी गटात जेरेमीने शानदार कामगिरी करताना ३०६ किलो वजन उचलून रौप्य जिंकले. त्याने स्नॅचमध्ये १४० किलो आणि क्लीन अ‍ॅण्ड जर्कमध्ये १६६ किलो वजनाचा भार उचलला. (वृत्तसंस्था)