शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महापौर कॅरम स्पर्धा : शरीफ शेख, श्रृती सोनावणे, नवीन पाटिल अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2019 18:25 IST

या स्पर्धेत चार ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.

मुंबई : तथास्तु ग्रुप, नालासोपारा  व पालघर डिस्ट्रीक्ट कॅरम असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रतिष्ठेची तिसरी महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धेच्या पुरुष एकेरी, महिला एकेरी, पुरुष प्रौढ गट आणि पुरुष .सांघिक गटात अनुक्रमे शरीफ शेख, श्रृती सोनावणे (प्रगती कॅरम क्लब), नवीन पाटील (यंगस्टर्स ट्रस्ट) व समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघ यांनी विजेतेपद पटकाविले. ही प्रतिष्ठित महापौर चषक अजिंक्यपद कॅरम स्पर्धा कपोल स्कुल, आचोळे रोड, नालासोपारा (पूर्व) जिल्हा पालघर येथे खेळविण्यात आली.

पुरुष एकेरीच्या अंतीम फेरीच्या सामन्यात बिनमानांकित प्रगती कॅरम क्लबच्या शरीफ शेखने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रात्यक्षिक घडवित अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माविरूद्ध पहिल्या गेममध्ये सहा बोर्डामध्ये २३-६ अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २ गुण मिळवून २५-६ असा पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेमध्ये शरीफ शेख पाचव्या बोर्डपर्यंत आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत २२-७ अशी आघाडी घेतली. नंतरच्या दोन बोर्डात प्रमोद शर्माने ५ आणि ३ गुण घेऊन १५-२२ असा पिछाडीवर होता. नंतरच्या आठव्या बोर्डमध्ये शरीफ शेखने शांत चित्ताने खेळत ३ गुण घेऊन २५-१५ असा गेम जिंकून विजेतेपदावर आपल्या नावाचे शिक्कामोर्तब केले. तिसऱ्या क्रमांकाच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीने दोन गेम रंगलेल्या एकतर्फी सामन्यात प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा २५-१०, २५-११ असा धुव्वा उडवला.

तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या महत्त्वाच्या सामन्यात शरीफ शेखने रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत यंगस्टार्स ट्रस्टच्या आशुतोष गिरीचा ४-२५, २५-१२, २५-८ अशी कडवी झंज मोडीत काढत अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात अग्रमानांकित वसईच्या प्रमोद शर्माने सरळ दोन गेम रंगलेल्या लढतीत प्रगती कॅरम क्लबच्या कैलाश वाघेलाचा २५-१७, २५-३ अशी मात करत अंतीम फेरी गाठली. 

महिला एकेरी गटाच्या अंतीम फेरीच्या दोन तास रंगलेल्या सामन्यात दुसरी मानांकित प्रगती कॅरम क्लबच्या श्रृती सोनावणेने यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेचा २५-९, २५-१७ अशी कडी झुंज मोडीत काढून विजेतेपदावर आपले नाव कोरले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या अंकीता हांडेने अग्रमानांकित यंगस्टार्स ट्रस्टच्याच वैशाली तांबेचा रोमहर्षक तीन गेम रंगलेल्या लढतीत २५-१०, १२-२५, २५-४ असा आ्श्चर्याचा धक्का देत अंतीम फेरी गाठली. पुरुष सांघिक गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात समाज उन्नती मंडळ ‘ब’ संघाने समाज उन्नती मंडळ ‘अ’ संघावर २-१ असा निसटता विजय मिळवित अजिंक्यपदावर आपले नाव कोरले. या स्पर्धेत चार ब्रेक टू फिनिश व एक ब्लॅक टू फिनिश नोंदवले गेले.

टॅग्स :Mayorमहापौर