शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

प्रेसिडेंट चषक मुष्टियुद्ध; मेरी कोमचा 'गोल्डन पंच'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 07:54 IST

सिमरनजित कौरनेही पटकावले सुवर्ण

नवी दिल्ली - सहा विश्वचषकांची मानकरी’ असलेली भारताची चॅम्पियन बॉक्सर एमसी मेरी कोम व सिमरनजित कौर यांनी रविवारी इंडोनेशियातील लाबुऑन बाजो येथे सुरू असलेल्या प्रेसिडेंट कप मुष्टियुद्ध स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले. भारतीय मुष्टीयोद्धयांनी या स्पर्धेत सात सुवर्ण व दोन रौप्यपदक पटकावली.

या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचलेल्या चारीही भारतीय महिला स्पर्धकांनी सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या गटांत तीन सुवर्ण मिळाली. दोघांना अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ऑलिम्पिकची कांस्यविजेती असलेल्या मेरी कोमने अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाची एप्रिल फ्रँक्स हिच्यावर ५-० ने सहज विजय साजरा केला. सिमरनजितने अंतिम सामन्यात आशियाई स्पर्धेतील कांस्यपदक विजेती इंडोनेशियाची हसानाह हुसवातुनला ५- ० असे पराभूत केले. आसामची युवा खेळाडू जमुना बोरोने ५४ किलोगटांत इटलीच्या ग्युलिया लमाग्नाला ५-० असे पराभूत केले. तर ४८ किलो वजनगटात मोनिकाने इंडोनेशियाच्या एनडांगला पराभूतकरत सुवर्णपदक मिळविले.

पुरुषांच्या गटात अंकुश दाहिया (६४), नीरज स्वामी (४९), अंनत चोपाडे (५२) यांनी सुवर्णपदक पटकावले. नीरजला अंतिम सामन्यातफिलिपाईन्सच्या मकाडो ज्युनियर रामेल याच्याकडून पराभूत व्हावे लागले. गौरव बिधुडी व इंडिया ओपनचा विजेता दिनेश डागर यांनाअंतिम फेरीत पराभव पत्करावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. ३६ वर्षांच्या मेरीने मे मध्ये इंडिया ओपनमध्ये देखील सुवर्ण जिंकले होते. विश्व चॅम्पियनशिपआधी काही बाऊट खेळून स्वत:ला फिट राखण्याची तिची योजना आहे. विश्व चॅम्पियनशिपचे आयोजन ७ ते २१ सप्टेंबर या कालावधीत होईल. इंडोनेशियात मी देशासाठी सुवर्णपदक जिंकले आहे. जिंकण्याचा अर्थ असतो की, तुम्ही आणखी जास्त मेहनत व अधिक प्रयत्न करण्यासाठी तयार आहात. मी प्रशिक्षक, स्टाफ त्याच बरोबर क्रीडामंत्री किरेन रिजीजू यांचे आभार मानते. - मेरी कोम

टॅग्स :Mary Komमेरी कोम