रिओ : आॅलिम्पिक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक अडचणीत सापडलेल्या क्रीडा महाकुंभाला शनिवार पहाटेपासून प्रारंभ होत आहे. त्यामुळे आयोजक सात वर्षांपासून करीत असलेल्या तयारीचा शेवट होणार असल्याची आशा आहे. दक्षिण अमेरिकेत प्रथमच आॅलिम्पिकचे आयोजन होत असून महान फुटबॉलपटू पेलेद्वारा शुक्रवारी आॅलिम्पिक उद््घाटन समारंभात रिओतील माराकाना स्टेडियममध्ये आॅलिम्पिक ज्योत प्रज्वलित करण्यात येणार आहे. हा उद््घाटन समारंभ म्हणजे नैसर्गिक सौंदर्यांत १७ दिवस रंगणाऱ्या उत्सवाची शानदार सुरुवात ठरेल, अशी आॅलिम्पिक प्रमुखांना आशा आहे. जमैकाचा ‘स्पिंट किंग’ उसेन बोल्ट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरेल.२००९ मध्ये रिओने आॅलिम्पिकचे यजमानपद मिळवले होते त्यावेळी ब्राझीलला आर्थिक मंदी, बेरोजगारी आणि डासांमुळे होणारा जिका व्हायरस यासारख्या अडचणींना सामोरे जावे लागेल याची कल्पना नव्हती. त्याचप्रमाणे राजकीय संकट, पायाभूत सुविधा उभारण्यासाठी संघर्ष आणि राष्ट्रपती दिल्मा रुसेफ यांच्यावर महाभियोग यासारख्या संकटांना ब्राझीलला सामोरे जावे लागले. या पार्श्वभूमीवर रिओचा आॅलिम्पिक यजमानपदाचा आनंद संपुष्टात आला. आॅलिम्पिकची सर्वांत आवडती स्पर्धा पुरुष विभागातील १०० मीटर फायनलचे १० लाख तिकीट म्हणजे एकूण तिकिटांच्या २० टक्के तिकिटेही विकल्या गेलेली नाहीत. यामुळे रिओची स्थिती बदलण्याच्या सर्व योजनांवर पाणी फेरल्या गेले. घाणीचे साम्राज्य असलेला भाग गुआनबारा बेच्या सफाई मोहिमेच्या संकल्पाचाही समावेश होता.
उद्घाटन समारंभासाठी माराकाना स्टेडियम सज्ज
By admin | Updated: August 5, 2016 03:53 IST