नवी दिल्ली : मनू भाकर व अनीश भानवाला यांसारख्या युवा खेळाडूंवर अपेक्षांचे ओझे टाकणे योग्य ठरणार नाही असे मत आशियाई सुवर्णपदक विजेता नेमबाज जसपाल राणा याने व्यक्त केले. अपेक्षांशिवाय ते आशियाई स्पर्धेत चांगली कामगिरी करतील असे ते म्हणाले.भाकर १६ वर्षाची असून अनीश १५ वर्षाचा आहे. दोघांनीही राष्टÑकुल स्पर्धेत अनुक्रमे १० मीटर एअर पिस्टल व २५ मिटर रॅपीड फायर पिस्टल प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. अनीश सध्या वरिष्ठ संघाबरोबर सराव करत आहे. तर भाकर भोपालमध्ये भारतीय ज्युनियर संघाचे प्रशिक्षक राणा यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. राणा म्हणाले, ‘या दोन मुलांकडून प्रत्येकजण अपेक्षा ठेवत आहे. त्यांच्यावरच सर्वांचे लक्ष आहे. मात्र ते अद्याप लहान आहेत. त्यामुळे कामगिरीत कमी जास्त होत आहे’.
मनू, अनीश यांच्यावर अपेक्षांचे ओझे नको : जसपाल राणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 06:05 IST