शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

मनप्रीतवर चार वर्षांची बंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 07:08 IST

नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर डोपिंगमध्ये चार वेळा पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) तिच्यावर चार ...

नवी दिल्ली: आशियाई चॅम्पियन गोळाफेकपटू मनप्रीत कौर डोपिंगमध्ये चार वेळा पॉझिटिव्ह आढळल्याने राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सीने (नाडा) तिच्यावर चार वर्षांची बंदी घातली आहे.

नाडाच्या डोपिंगविरोधी शिस्तपालन समितीनुसार मनप्रीतवरील बंदी २० जुलै २०१७ पासून लागू राहील. नाडाचे संचालक नवीन अग्रवाल म्हणाले,‘ मनप्रीत कौरवर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या निर्णयाविरुद्ध डोपिंग विरोधी अपील पॅनलकडे मनप्रीत दाद मागू शकेल.’

या निर्णयानंतर मनप्रीतला २०१७ मध्ये भुवनेश्वर येथे झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपचे सुवर्ण व राष्ट्रीय विक्रम गमवावा लागेल. मनप्रीतचे नमुने २०१७ मध्ये चारवेळा पॉझिटिव्ह आढळले. त्यात चीनच्या जिन्हुआ येथे २४ एप्रिल रोजी आशियाई ग्रँडप्रीक्सचे, पतियाळा येथे १ जूनपासून फेडरेशन चषक स्पर्धेचे, भुवनेश्वरमध्ये ६ जुलैपासून आशियाई अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपचे व गुंटूरमध्ये जुलै २०१७ ला झालेल्या आंतरराज्य स्पर्धेचा समावेश होता. या सर्वच स्पर्धांमध्ये मनप्रीतने सुवर्ण पदक जिंकले होते. जिन्हुआ येथे मनप्रीतने १८.८६ मीटर गोळाफेक करीत राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली होती. या स्पर्धेत घेतलेल्या मनप्रीतच्या नमुन्यात मेथेनोलॉन आढळले, तर अन्य तीन स्पर्धांदरम्यान घेतलेल्या नमुन्यात डिमिथाइलब्यूटीलामाईन हे द्रव्य आढळले.