शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मनिका बत्राच्या विजयाने रचला इतिहास; भारत पहिल्यांदाच टेबल टेनिसच्या उपांत्यपूर्व फेरीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 18:07 IST

Manika Batra Table Tennis, India at Paris Olympics 2024: भारत-रोमानिया २-२ अशा बरोबरीत असताना मनिका जिंकली निर्णायक मॅच

Manika Batra Table Tennis, India at Paris Olympics 2024: अनुभवी खेळाडू मनिका बत्राच्या चमकदार कामगिरीमुळे भारतीय महिला टेबल टेनिस संघाने इतिहास रचला. भारतीयटेबल टेनिस संघ प्रथमच ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. राउंड ऑफ 16 च्या सामन्यात भारताने रोमानियाचा ३-२ असा पराभव करत पुढील फेरीत प्रवेश केला. उपांत्यपूर्व फेरीत भारताचा सामना अमेरिका किंवा जर्मनीशी होईल. निर्णायक लढतीत मनिका बत्राने मिळवलेल्या विजयाच्या जोरावर भारताने पहिल्यावहिल्या क्वार्टरफायनलमध्ये धडक मारली.

असा रंगला भारत-रोमानिया सामना

भारतासाठी श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत या जोडीने दुहेरीचा सामना जिंकून आघाडी घेतली, त्यानंतर मनिकाने आपला एकेरी सामना जिंकून २-० अशी आघाडी घेतली. मात्र, श्रीजा अकुला आणि अर्चना गिरीश कामत यांनी आपापले एकेरीचे सामने गमावले. त्यामुळे रोमानियाने २-२ अशी बरोबरी साधली होती. निर्णायक सामना खेळण्यासाठी मनिका बत्रा कोर्टवर आली. मनिका बत्राने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करत प्रतिस्पर्ध्याच्या ११-५, ११-९ आणि ११-९ असा पराभव करत भारतासाठी इतिहास रचला.

श्रीजा अकुला आणि अर्चना कामथ यांनी दुहेरीच्या सामन्यात एडिना डायकोनू आणि एलिझाबेथ समारा यांच्यावर ११-९, १२-१०, ११-७ असा विजय नोंदवला होता. मनिकाने तिच्या एकेरीच्या सामन्यात बर्नाडेट झॉक्सचा ११-५, ११-७, ११-७ असा पराभव केला होता. नंतर भारताला सलग दोन पराभवांना सामोरे जावे लागले. अखेर भारताकडून मनिकाने अनुभवाचा वापर करत संघाचे आव्हान जिवंत ठेवले.

टॅग्स :paris olympics 2024पॅरिस ऑलिम्पिक २०२४Manika Batraमनिका बत्राTable Tennisटेबल टेनिसIndiaभारत