शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मल्ल बजरंग पुनिया सुवर्णमय कामगिरीसह अव्वल स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 03:19 IST

बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे

रोम : टोकियो ऑलिम्पकच्या तयारीत असलेला मल्ल बजरंग पुनियाने अखेरच्या ३० सेकंदात दोन गुणांची शानदार आघाडी घेत माटियो पेलिकोन रॅंकिंग कुस्ती सिरिजचे सुवर्णपदक जिंकले. या जेतेपदाचा बचाव करणारा बजरंग ६५ किलो वजन गटात पुन्हा नंबर वन मल्ल बनला.मंगोलियाचा तुल्गा तिमूर याच्याविरुद्ध अंतिम फेरीत बजरंग ०-२ ने माघारला होता. मात्र अखेरच्या काही सेकंदांत दोन गुणांची मुसंडी मारून बजरंगने जेतेपदावर नाव कोरले. २७ वर्षांच्या बजरंगचा बचाव बलाढ्य होताना दिसत आहे.

बजरंग आता राष्ट्रीय शिबिरात सहभागी होऊ इिच्छतो, मात्र त्याला ९ ते १३ एप्रिल या कालावधीत कझाखस्तानमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशिपआधी विदेशात सराव करायचा आहे. तो म्हणाला, ‘मी विदेशात सराव करू इच्छितो. युरोपात प्रवासावर निर्बंध असून, कोरोनाची स्थिती वाढत आहे. या काळात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते, त्यामुळे हे शक्य होईल, असे म्हणता येणार नाही.’ या स्पर्धेआधी बजरंग ६५ किलो गटात दुसऱ्या स्थानावर होता. येथे १४  गुणांची कमाई केल्याने तो पुन्हा  नंबर वन बनला.

विशाल कालिरमन याने ७० किलो वजन गटात प्रभावी कामगिरी करीत कझाखस्तानचा मल्ल सीरबाज तालगत याला ५-१ ने नमवून कांस्य जिंकले. दरम्यान, डोपिंगमुळे चार वर्षांच्या बंदीनंतर रिंगणात आलेला नरसिंग पंचम यादव हा मात्र कांस्य पदकाच्या लढतीत कझाखस्तानचा मल्ल दानियार कैसानोव याच्याकडून पराभूत झाला.

‘कोरोना काळात माझ्या बचाव करण्याच्या तंत्रात सुधारणा झाली. तरीही यावर मेहनत घेत आहे. आक्रमक हालचाली अधिक तीव्र कराव्या लागतील. मंगोलियाच्या खेळाडूविरुद्ध लढत फार खडतर होती. ६५ किलो वजन गटात मंगोलियाच्या खेळाडूनेदेखील पात्रता गाठली असल्याने ऑलिम्पिकमध्ये कडवे आव्हान असेल. आम्हा सर्व मल्लांचा स्तर सारखा असल्यामुळे अनेक संभाव्य विजेते आहेत.’ - बजरंग पुनिया

भारताने यंदा या पहिल्या रॅंकिंग सिरिजमध्ये सात पदके जिंकली. महिला गटात विनेश फोगाट हिने सुवर्ण, तर सरिता मोरे हिने रौप्य जिंकले. ग्रीको रोमन प्रकारात नीरज यादवने ६३ किलो गटात, कुलदीप ७२ आणि नवीन कुमार याने १३० किलो वजन गटात कांस्य पदके जिंकली. यानंतर बजरंगने सुवर्ण, तर कालिरमन याने कांस्य पदकाची कमाई केली. 

टॅग्स :Wrestlingकुस्तीGold medalसुवर्ण पदक