शहरं
Join us  
Trending Stories
1
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
2
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
3
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
4
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
5
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
6
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
7
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
8
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
9
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
10
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
11
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
12
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
13
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
14
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
15
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
16
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
17
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
18
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
19
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
20
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
Daily Top 2Weekly Top 5

कोहलीला पूर्णवेळ कर्णधार बनवा - इयान चॅपेल

By admin | Updated: December 14, 2014 17:06 IST

अ‍ॅडलेडवरील कसोटीत कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दोन्ही डावात शानदार शतक ठोठावणा-या विराट कोहलीकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे असे मत इयान चॅपेल यांनी व्यक्त केले आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १४ - अ‍ॅडलेडवरील कसोटीत पहिल्यांदाच कर्णधारपदाची धुरा सांभाळताना दोन्ही डावात शानदार शतक ठोठावणा-या विराट कोहलीकडेच पूर्णवेळ कर्णधारपद देण्यात यावे असे मत ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी एका लेखात व्यक्त केले आहे. 
भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या अनुपस्थितीत कोहलीकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. त्याने ही जबाबदारी यशस्वीरित्या तर सांभाळलीच आणि कसोटीच्या दोन्ही डावात शतके झळकावत भारताला विजयाच्या समीप नेले. मात्र भारताला हा सामना जिंकण्यात अपयश आले. भारतीय संघ या कसोटीत जिद्दीने लढताना दिसला, त्यामुळे जरी आपण हा सामना हरलो असलो तरी प्रेक्षकांची मनं भारतीय संघाने जिंकली. आणि त्याचं श्रेय टीम इंडियाचा तात्पुरता कर्णधार विराट कोहलीला दिलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर चॅपेल यांनी हे मत व्यक्त केले आहे.
धोनीकडून कोहलीकडेच कर्णधारपदाची सूत्रं देण्याची हीच योग्य वेल असल्याचे चॅपेल यांनी म्हटले आहे. पहिल्या कसोटीत कोहलीने जे नेतृत्वगुण दाखवले आहेत, ते ओळखून निवड समितीने त्याच्याकडे कर्णधारपदाची धुरा दिली पाहिजे. त्याची शारिरीक क्षमता उत्तम आहे, त्याच्या  खेळीने प्रतिस्पर्ध्यांना इशारा दिला आहे. त्याने गोलंदाजांनाही योग्यपद्धतीने वापरून घेतले आहे. त्याच्यामध्ये पूर्णवेळ कर्णधारपद स्वीकारण्याची क्षमता आहे, असे चॅपेल यांनी म्हटले आहे. मात्र असे असले तरी कर्णधारपदावर असताना रागावर नियंत्रण ठेवणं, डोक शांत ठेवणं हे अतिशय महत्वाचं असतं आणि कोहली त्यात अजूनही थोडा कमी पडतोय असेही चॅपेल यांनी लेखात नमूद केले आहे.