शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

‘देशहितासाठी योग्य निर्णय घ्यावा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:37 IST

विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले

नवी दिल्ली : ‘मी बॉक्सिंग महासंघाला देश खेळ आणि खेळाडूंच्या हितार्थ सर्वोत्कृष्ट निर्णय घेण्यास सांगणार आहे. मंत्री हे क्रीडा महासंघाद्वारा होणाऱ्या खेळाडू निवड प्रक्रियेत हस्तक्षेप करीत नाहीत कारण क्रीडा महासंघ आॅलिम्पिक चार्र्टनुसार स्वायत्त आहेत,’ असे क्रीडामंत्री कीरेन रिजिजू यांनी बॉक्सर निकहत झरीनच्या पत्राला उत्तर दिले.

आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेआधी भारतीय संघाची निवड करताना दिग्गज मेरीकोमविरुद्ध निवड चाचणी घ्यावी, अशी मागणी निकहतने गुरुवारी क्रीडामंत्री रिजिजू यांच्याकडे पत्राद्वारे केली होती.या पत्राला उत्तर देताना रिजिजू म्हणाले की, ‘मी निश्चितच बॉक्सिंग महासंघाला देश, खेळाडू व खेळाच्या हिताच्या दृष्टीने योग्य निर्णय घेण्यास सांगेन.’ दरम्यान मेरीकोमने याआधीच मी बीएफआयच्या सुचनेनुसार खेळेल, असे स्पष्ट केले होते. विश्व स्पर्धेत मेरीकोमला ५१ किलो गटात कांस्यवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेसाठी संघाची निवड करत मेरीकोमची सातत्यपूर्ण कामगिरी पाहता भारतीय बॉक्सिंग महासंघाने (बीएफआय) तिला निवड चाचणीत न खेळवता थेट भारतीय संघात निवडले होते.निकहतने मानले आभारझरीनला विश्व स्पर्धेसाठी चाचणीची संधी नाकारण्यात आली. बीएफआयने त्यावेळी इंडिया ओपन आणि प्रेसिडेंट कपमध्ये सुवर्ण जिंकणाºया मेरीकोमची निवड केली होती. रिजिजू यांच्या वक्तव्यावर निकहत म्हणाली,‘ मला निष्पक्ष संधी मिळण्याची अपेक्षा आहे. तुम्ही ताबडतोब दखल घेतल्याबद्दल आभार. देशाचा सन्मान वाढविण्यासाठी अहोरात्र घाम गाळणाºया खेळाडूंसोबत पक्षपात आणि दुजाभाव होणार नाही, अशी अपेक्षा आहे. निकहतला आॅलिम्पिक सुवर्ण विजेता नेमबाज अभिनव बिंद्रा यानेदेखील पाठिंबा दर्शविला आहे.