राष्ट्रीय बास्केटबॉलसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर
By admin | Updated: November 21, 2014 22:38 IST
आजपासून रंगणार स्पर्धा
राष्ट्रीय बास्केटबॉलसाठी महाराष्ट्राचे संघ जाहीर
आजपासून रंगणार स्पर्धा नाशिक : भारतीय बास्केटबॉल महासंघ, जिल्हा व राज्य बास्केटबॉल असोसिएशन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३ वर्षे वयोगटाच्या राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेस शनिवारपासून (दि़ २२) शहरात सुरुवात होत आहे़ या स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघाची आज घोषणा करण्यात आली़पंचवटीतील विभागीय क्रीडा संकुलात शनिवारी सायंकाळी ५ वाजता या स्पर्धांना प्रारंभ होणार आहे़ यजमान महाराष्ट्राच्या संघांची घोषणा संघटनेच्या वतीने करण्यात आली़ संघ याप्रमाणे : मुले- साहिल बाबर (सातारा), सोहम शिंदे (सिंधुदुर्ग), नीलेश यादव, कोनाथ खान, दिलीपकुमार हेराजान, साद शेख, अब्दुल्ला हमीद (सर्व मुंबई), यश पगारे (पुणे), सौरभ व्यवहारे, अथर्व व्यवहारे (दोघे नाशिक)़ प्रशिक्षक रिझवान अन्सारी, रोहन गज्जर, व्यवस्थापक अंकुर गरुड़ मुली- रेश्मा राका, राधा हरदास (नाशिक), दर्शना दीपक, ईिशना सुर्वे (मुंबई), राधिका नाईक, अनुष्का गोरे (पुणे), अभा लाड (नागपूर), सारिका शंकर (धुळे), तनिष्का शानभाग, श्रुती भोसले (सातारा)़ प्रशिक्षक अभिजित नागरे, शुभांगी लोखंडे, व्यवस्थापक स्वाती रणभिसे़ फोटो - आर फोटो वर- 21 बास्केटबॉल व 21 बास्के टबॉल 1फोटो ओळी - राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेसाठी जाहीर करण्यात आलेले महाराष्ट्राचे मुले व मुलींचे संघ़ समवेत संघटनेचे पदाधिकारी़