शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्राचा ओमकार यादव ठरला चॅम्पियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2018 21:16 IST

पहिली गोवा ग्रॅण्डमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा : ‘ब’ गटात टायब्रेकरवर मारली बाजी

ठळक मुद्देटायब्रेकरवर विजयला पछाडत साताºयाच्या ओमकारने गोव्यातील पहिली गोवा ग्रॅण्डमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.

पणजी : अत्यंत चुरशीच्या झालेल्या ‘ब’ गटात (१९९९ रेटिंग खालील) बाजी मारली ती महाराष्ट्राच्या ओमकार यादव याने. त्याने ९ गुणांसह बरोबरीवर असलेल्या विजय कुमार याचा पराभव केला. १० फेऱ्यांअंती हे दोघेही समान गुणांवर होते. टायब्रेकरवर विजयला पछाडत साताºयाच्या ओमकारने गोव्यातील पहिली गोवा ग्रॅण्डमास्टर आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकली. ही स्पर्धा गोवा बुद्धिबळ संघटनेने अखिल भारतीय बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेखाली ताळगाव येथील श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियमवर आयोजित केली होती. या गटात विजय कुमार हा उपविजेता तर राहुल सोरम सिंग हा तिसºया स्थानी राहिला.

विजेत्या ओमकारला १ लाख ४० हजार रुपये व चषक तर उपविजेत्या विजयला १ लाख १५ हजार रुपये व चषक प्रदान करण्यात आला. दहाव्या फेरीत ओमकारने रिषभ निशादचा तर विजयने के . प्रशांतचा पराभव केला. गोव्याचा आघाडीचा खेळाडू अनिरुद्ध भट हा ६.५ गुणांसह ५८ व्या स्थानावर राहिला. त्याला उत्कृष्ट गोमंतकीय खेळाडूचा पुरस्कार प्राप्त झाला. अनिरुद्ध पार्सेकर ७२ व्या तर अन्वेश बांदेकर हा ६ गुणांसह ८८ व्या स्थानी राहिला.बक्षीस वितरणास नेस्ले ग्रुपचे संजय बांदेकर, उद्योजिका तानिया अलुवालिया, गोवा बुद्धिबळ संघटनेचे सचिव किशोर बांदेकर, आर्बिट्रेटर अरविंद म्हामल, दत्ताराम पिंगे, बालकृष्णन्, संजय बेलूकर, विश्वास पिळर्णकर, आशिष केणी आणि महेश कांदोळकर उपस्थित होते. गोव्याचा यश मनोज उपाध्ये हा १०९९ इलो गटात उत्कृष्ट खेळाडू ठरला. ११९९ इलो गुणांखालील गटात जुर्गन रॉड्रिग्स, अन्वेश बांदेकरला १३९९ तर इलियास बारेट्टोची बिनमानांकित गटातून उत्कृष्ट खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. या गटात तीन देशांतील एकूण ४३३ खेळाडूंनी भाग घेतला होता.सॅमवेल आघाडीवर, अभिजित बरोबरीवर समाधानअर्मेनियाचा ग्रॅण्डमास्टर तेर एस सॅमवेल याने जबरदस्त मुसंडी मारत गोव्यात सुरू असलेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेत ‘अ’ गटात पाचव्या फेरीअंती ५ गुणांसह संयुक्त आघाडी घेतली आहे. त्याने गोव्याचा ग्रॅण्डमास्टर अनुराग म्हामल याचा पराभव केला. इराणचा इदानी पौया आणि युक्रेनचा सियुक विटली हे सुद्धा प्रत्येकी ५ गुणांवर आहे. गोव्याच्या वृत्विज परब याने महाराष्ट्राचा ग्रॅण्डमास्टर अभिजित कुंटे याला बरोबरीवर रोखले. हा स्पर्धेतील लक्षवेधी निकाल ठरला.ही स्पर्धा ताळगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर खेळविण्यात येत आहे. स्पर्धेच्या चौथ्या दिवशी गोमंतकीय खेळाडूंची कामगिरी मात्र संमिश्र ठरली. चौथ्या फेरीअंती संयुक्त आघाडीवर असलेला अनुराग आता १९ व्या स्थानी घसरला. ऋत्विजपरब याने अभिजितला रोखून कमाल केली. त्याने ५४ चाली रचल्या. या बरोबरीनंतर अभिजित ३.५ गुणांसह १६ व्या स्थानी आहे. अभिजितने आतापर्यंत दोन विजय आणि तीन सामन्यांत बरोबरी साधली आहे. दुसरीकडे, ऋत्विजने यापूर्वी हैदराबाद येथील स्पर्धेत ग्रॅण्डमास्टर दीपन चक्रवर्ती याला बरोबरीवर रोखत अशीच कामगिरी केली होती. तो आता ३.५ गुणांसह ४४ व्या स्थानी आहे.गोव्याचा महिला ग्रॅण्डमास्टर भक्तीकुलकर्णी हिने कार्तिक साईला बरोबरीवर रोखले. ती ३ गुणांवर आहे. फिडे मास्टर अमेय अवदी याने चौथ्या फेरीत पुनरागमन करीत रामकृष्ण जे याचा पराभव केला. आता तो ३.५ गुणांसह ५५ व्या स्थानी आहे. नीतीश बेलूरकरने सोहम दातारचा पराभव केला. तो ३.५ गुणांवर आहे. नीरज सारीपल्ली, ओम बर्डे, रुबेन कुलासो, उमंग कैसरे, विल्सन क्रुझ, देवेश आनंद नाईक, तन्वी हडकोणकर यांनी सुद्धा विजय नोंदवले. नीरज आणि ओम बर्डे हे प्रत्येकी ३ गुणांवर आहेत.

 

टॅग्स :Chessबुद्धीबळgoaगोवा