शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

शेतकरी बापाच्या 'कर्जा'चं ऋण फेडलं; खेलो इंडियात पोरीनं 'सुवर्ण' जिंकलं!

By स्वदेश घाणेकर | Updated: January 16, 2020 10:25 IST

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या या सुवर्णकन्येचं कौतुक

गुवाहाटी येथे सुरू असलेल्या खेलो इंडिया २०२० स्पर्धेत पदकांचे शतक साजरं करण्याचा मान महाराष्ट्राने सर्वप्रथम पटकावला आहे. यात कोल्हापूरच्या एका खेळाडूनं पदकांचा नुसता 'धुरळा' उडवला आहे. या स्पर्धेत तिनं चार सुवर्ण आणि एक कांस्यपदक पटकावलं आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेली, त्यामुळेच संकटासमोर न खचता लढण्याचे बाळकडू लहानपणीच प्यायलेल्या पूजा दानोळेनं गुवाहाटीत आपला दबदबा दाखवून दिला आहे.

दमदार कामगिरी करण्याच्या आत्मविश्वासानेच पूजा या स्पर्धेत सायकलिंग ट्रॅकवर उतरली होती. पण आपण राष्ट्रीय विक्रम मोडू शकू का, याबद्दल मनात जरा शंकाच होती, असं मूळच्या इंगळी गावातील पूजानं सांगितलं. सुरुवातीपासून स्विमिंगची ( जलतरण) आवड असलेली पूजा अपघातानं सायकलिंगमध्ये आली. शाळेत असताना सायकलशी संबंध केवळ ट्रायथलॉन क्रीडा प्रकारापुरता यायचा. पण शाळेतील शिक्षकांनी पूजामध्ये असलेले टॅलेंट हेरलं आणि तिला सायकलिंग स्पर्धेसाठी बोलावलं.

त्या स्पर्धेत पडली नसती, तर आज ती या खेळात नसती!पहिल्याच  जिल्हास्तरीय सायकलिंग स्पर्धेत सहभागी झालेल्या पूजानं तिसरं स्थान पटकावलं. तिनं सांगितलं, "ट्रायथलॉन पुरती मी सायकलिंग करायची. पण शाळेतील शिक्षकांनी मला जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेण्यास सांगितलं. स्पर्धेत एका वळणावर मी पडले. पण, त्यानंतर जिद्दीने उभी राहताना तिसरं स्थान पटकावलं. त्याचवेळी पुढच्याचवर्षी ही स्पर्धा जिंकण्याचा निर्धार केला आणि सायकलिंगची सुरुवात केली. पुढील वर्षी स्पर्धा जिंकून मला दीपाली पाटील मॅडमनी बालेवाडीत प्रवेश घेण्यास सांगितले. तिथून सायकलिंगचा प्रवास सुरू झाला." 

पूजानं पहिल्या वर्षी राष्ट्रीय स्पर्धेत केवळ सहभाग घेतला होता. तेव्हा तिनं या खेळाचे बारकावे जाणून घेतले. त्यानंतर पुढील स्पर्धेत पदकांची लयलूट केली. त्यामुळे तिला राष्ट्रीय कॅम्पसाठी दिल्लीत भारतीय क्रीडा प्राधिकरणात बोलावणे आले. मागील चार वर्षांपासून ती सायकलिंग करत आहे. कोल्हापूरमध्ये पूजा दररोज २५-२५ किलोमीटर सायकलिंग करून सराव करायची. वडील आणि मोठा भाऊ दोघेही खेळाडू असल्यानं त्यांच्याकडूनही तिला प्रोत्साहन मिळालं.

पूजाचे वडील बबन दानोळे हे माजी आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आहेत, तर भाऊ हर्षद हाही राष्ट्रीय पदकविजेता कुस्तीपटू आहे. त्यामुळे घरातून प्रोत्साहन मिळतच होतं. पण, या क्षेत्राशी संबंध नसतानाही पूजाची आई अर्चना यांचा या यशात खारीचा वाटा आहे. अपयश आले तरी खचू नकोस, प्रयत्न करत रहा, एकदिवस यश नक्की मिळेल, हे आई सतत सांगते आणि त्यामुळेच मला संघर्ष करण्याची ताकद मिळते, असं पूजाने सांगितले. 

सायकलिंग हा महागडा खेळ. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला तो परवडणं शक्य नाही. पण, मुलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी वडिलांनी कर्ज काढलं आहे. पूजाच्या यशानं त्या कर्जाचं ऋण फेडल्याची भावना नक्की वडिलांच्या मनात असेल. शेतीसोबतच पूजाचे वडील खासगी बँकेत क्लार्क म्हणून कामाला आहेत. पूजाच्या स्वप्नासाठी त्यांनी जवळपास पाच लाखांचं कर्ज काढलं आहे.

खाशाबा जाधवांसारखा पराक्रम करायचाय! 

भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले वैयक्तिक पदक जिंकून देण्याचा मान हा महाराष्ट्राच्या कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या नावावर आहे. तसाच मान पूजाला पटकवायचा आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत सायकलिंगमध्ये भारताचे पहिले प्रतिनिधित्व आणि पहिले पदक तिला जिंकायचे आहे. २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेच्या दृष्टीने तयारीही सुरू केल्याचे तिने सांगितले.  आता अकरावीत असलेल्या पूजाला पदवीधर अभ्यास पूर्ण करून आयपीएस अधिकारीही बनायचे आहे. 

आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या पूजाचे कौतुकमहाराष्ट्राच्या पूजाने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर सोनोवाल यांनी आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी कौतुक केले. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई वडिल काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई वडिलांचेही अभिनंदन करायला हवे आणि भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग असेही त्यांनी सांगितले 

टॅग्स :Khelo Indiaखेलो इंडियाMaharashtraमहाराष्ट्रkolhapurकोल्हापूरCyclingसायकलिंग